Maratha Reservation : मराठा अन् कुणबी नोंदीचा घोळ! भाऊ मराठा तर बहीण कुणबी…

Maratha Reservation :  मराठा अन् कुणबी नोंदीचा घोळ! भाऊ मराठा तर बहीण कुणबी…

Maratha Reservation : काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा समाजाला कुणबीचे दाखले देऊन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांनी केली. या मागणीसाठी जरांगेंनी आमरण उपोषण छेडलं तर राज्यभरातील मराठा आंदोलकांनी मोर्चे, आंदोलने, जाळपोळ करुन जरांगेंना समर्थन दिल्याचं दिसून आलं. अखेर जरांगेंच्या मागणीनंतर सरकारने माजी न्यायमूर्ती शिंदे समिती गठीत करुन पुरावे शोधण्याचे आदेश दिलेत.

जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानं अनेकांचे वाईट मनसुबे उधळले गेले; सामंतांचे विरोधकांवर टीकास्त्र

सध्या मराठवाड्यात शिंदे समितीकडून पुरावे शोधण्याचं काम सुरु असतानाच दुसरीकडे अहमदनगरमधील जामखेड तालुक्यात सख्ख्या बहीण भावाच्या नोंदीमध्ये घोळ असल्याचं दिसून आलं आहे. एकाच घरातील भाऊ बहिणीच्या दाखल्यांवर जातीची नोंद वेगळी असल्याचं समोर आलं आहे. बहिणीची नोंद कुणबी तर भावाची मराठा असल्याचं समोर आलं आहे. मोरे कुटुंबात भाऊ मराठा तर बहीण कुणबी असल्याने एकाच घरात वेगवेगळी नोंद कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Israel: ‘हा आमच्या अस्तित्वाचा लढा…’; इस्रायलचा युद्धबंदीला नकार, संघर्ष आणखी तीव्र होणार

चंद्रभागा भाऊ मोरे – हिंदू कुणबी आणि दिगंबर भाऊ मोरे – हिंदू मराठा, अशी शाळेच्या दाखवल्यांवर नोंद आहे. यामुळे मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यात यावे अशी मागणी होत आहे. राज्यातील अनेक भागांत हा पेच आता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. राज्यभरात काही मराठा बांधवांच्या नोंद कुणबी तर काहींच्या मराठा लावलेल्या आहेत.

World Cup 2023 : विजय टीम इंडियाचा पण, पाकिस्तान हॅपी; सेमी फायनलचं गणित जुळणार ?

पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची प्रमाणपत्रे व्हायरल झाल्याने प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, जामखेड तालुक्यातील साकत गावात १९२० पर्यंत अनेक दाखल्यांवर कुणबी नोंद आहेत. १९२० नंतर मात्र, मराठा नोंद लागल्या असल्याचं समोर आलं आहे.

सध्या मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांचा संघर्ष सुरु आहे. फडणवीस सरकारने दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं मात्र, हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द करण्यात आलं आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी राज्यातील मराठा बांधवांना कुणबीचे दाखले देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी लावून धरली आहे. या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत अनेक आंदोलने केली. याआधी जरांगे पाटील अंतरवली सराटीत आमदरण उपोषणाला बसले. त्यानंतर आता पुन्हा एकदा 9 दिवस त्यांनी उपोषण केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज