700 कोटींचा घोटाळा, सपा नेते विनय शंकर तिवारींना ईडीकडून अटक

700 कोटींचा घोटाळा, सपा नेते विनय शंकर तिवारींना ईडीकडून अटक

Vinay Shankar Tiwari : 700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी करावाई करत समाजवादी पक्षाचे (SP) नेते आणि माजी आमदार विनय शंकर तिवारी (Vinay Shankar Tiwari) यांना अटक केली आहे. विनय तिवारी यांच्यासह त्यांच्या कंपनीचे एमडी अजित पांडे (Ajit Pandey) यांनाही ईडीकडून अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, सोमवारी सकाळी ईडीने गोरखपूर, लखनऊ, नोएडा, मुंबईसह देशातील सुमारे दहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. यानंतर तिवारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ईडीने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र तयार केले होते अशी देखील माहिती समोर आली आहे.

बँक फसवणुकी प्रकरणी अटक

माहितीनुसार, ईडीच्या (ED) तपासात मेसर्स गंगोत्री एंटरप्रायझेस लिमिटेडने त्यांच्या प्रवर्तक, संचालक आणि हमीदारांसह बँक ऑफ इंडियाच्या नेतृत्वाखालील सात बँकांच्या संघाकडून 1129.44 कोटी रुपयांच्या कर्ज घेतला होता आणि त्यानंतर ही रक्कम इतर कंपन्यांकडे वळवली आणि बँकांना पैसे परत केले नाहीत. यामुळे बँकांच्या संघाला सुमारे 754.24 कोटी रुपयांचे नुकसान झाले. नोव्हेंबर 2023  मध्ये ईडीने माजी आमदार विनय शंकर तिवारी यांच्या 72.08 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या.

विनय तिवारींच्या 27 मालमत्ता जप्त 

विनय तिवारी यांच्या कंपनी गंगोत्री एंटरप्रायझेस लिमिटेडने बँकांच्या संघाकडून सुमारे 1129.44 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. बँकांच्या तक्रारीवरून, सीबीआय मुख्यालयाने गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर ईडीने विनय तिवारीसह कंपनीच्या सर्व संचालक, प्रवर्तक आणि जामीनदारांविरुद्ध मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली.

मुस्कान आई होणार, प्रेग्नेंसी रिपोर्ट पॉझिटिव्ह; जाणून घ्या तुरुंगात जन्मलेल्या मुलाचे हक्क काय?

2023 मध्ये ईडीच्या क्षेत्रीय कार्यालयाने गोरखपूर, महाराजगंज आणि लखनऊ येथे असलेल्या विनय तिवारीच्या एकूण 27 मालमत्ता जप्त केल्या होत्या, ज्यामध्ये शेती जमीन, व्यावसायिक संकुले, निवासी संकुले, निवासी भूखंड इत्यादींचा समावेश होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube