दर कडाडले, चोरट्यांनी टोमॅटोने भरलेला अख्खा ट्रकच लुटला

दर कडाडले, चोरट्यांनी टोमॅटोने भरलेला अख्खा ट्रकच लुटला

Stolen tomatoes : गेल्या महिनाभरात टोमॅटोचे दर (Tomato rates) गगणाला भिडले आहेत. पावसाळ्यात टोमॅटोबरोबरच इतर भाज्यांच्या दरातती कमालीची वाढ होत असते. मात्र, टोमॅटोने हाईटच केली. टोमॅटोच्या किंमतींनी शंभरी पार केली. त्यामुळं आता चोरट्यांची नजर टोमॅटोवर पडत आहे. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. अशात आता बेंगळुरूमध्ये काही चोरट्यांनी टोमॅटोने भरलेला अख्खा ट्रक लुटला आहे. (A pickup truck full of tomatoes was stolen by thieves in Bengaluru)

https://www.youtube.com/watch?v=I2f9gQrbQD0

पाठलाग करून ट्रक लुटला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी चित्र दुर्गातील हिरीयुर येथील एक शेतकरी अडीच टन किलो टोमॅटो पिकअप ट्रकमध्ये भरून कोलारच्या दिशेने जात होता. बेंगळुरूजवळील चिक्काजाला येथे तीन लोकांच्या टोळीने कारमधून टोमॅटोने भरलेल्या ट्रकचा पाठलाग केला. दरम्यान, टोमॅटोने भरलेले पिकअप वाहन आणि कार यांच्यात धडक झाली. त्यानंतर कारमधील तीन आरोपींनी पिकअप वाहन थांबवले आणि त्यांनी चालकाला मारहाण करत गोंधळ घातला. आरोपींनी कारमध्ये बसलेल्या शेतकऱ्यावरही हल्ला केला. दरम्यान, आरोपींनी अपघाताची नुकसान भरपाई म्हणून मोठ्या रकमेची मागणी केली आणि मोबाईल फोनवरून पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले.

रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाकडून बांगलादेशचा धुव्वा; दीप्ती-शेफालीची शानदार गोलंदाजी 

आपल्याकडे पैसे नसल्याचं शेतकऱ्याने आरोपींना सांगितलं. गयावया केली. मात्र आरोपींनी शेतकऱ्याचे काहीही ऐकले नाही. दमदाटी करूनही शेतकरी पैसे देत नसल्यानं आरोपींनी गाडीतील टोमॅटो पाहून टोमॅटोचा ट्रक पळवण्याचा बेत आखला. शेतकऱ्याने सांगितले की, प्रथम आरोपी जबरदस्तीने ट्रकमध्ये बसले. त्यांनी ट्रक चालवला. नंतर आपल्याला वाहनातून ढकलून देत ट्रक घेऊन पळ काढला.

ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. यानंतर बेंगळुरू येथील आरएमसी यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, ट्रकमध्ये सुमारे अडीच टन टोमॅटो होते, ज्याची किंमत अडीच ते तीन लाख रुपये होती. दरम्यान, आता पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे.

अन्य कोठे झाली चोरी?
कर्नाटकातील बेलूरमध्ये चोरींनी एका शेतातून २.७ लाख रुपये किमतीचे टोमॅटो चोरून नेले आहेत. बेलूर येथील एका शेतकऱ्याने सांगितले की, मंगळवारी रात्री चोरट्यांनी शेतातील टोमॅटो चोरले. आम्ही दोन एकरात टोमॅटोची लागवड केली होती. पण आम्हाला काहीच मिळाले लागले नाही. तर तेलंगणातील मेहबूबाबाद जिल्ह्यात एका दुकानातून 20 किलो टोमॅटोची चोरी झाली आहे. त्यामुळं आता टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून शेतकरी, विक्रेते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. युपीमधील एका टोमॅटोच्या दुकानावर विक्रेत्याने चक्क रक्षक तैनात केलेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube