Delhi Assembly Result : पोस्टलमध्ये भाजपची सरशी; केजरीवाल, सिसोदियांसह आपचे दिग्गज पिछाडीवर
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज (शनिवार) पार पडत आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या मोजणीला सुरूवात झाली. यात हाती आलेल्या कलांनुसार भाजपने सरशी मारली आहे. 70 पैकी भाजपने 43 जागांवर सरशी मारली आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष 25 जागांवर अडकला आहे. काँग्रेसला केवळ 2 जागांवर यश मिळताना दिसत आहे.(BJP leads in Delhi Assembly Results, Kejriwal, Sisodia, AAP veterans trailing)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांसाठी बुधवार (5 फेब्रुवारी) मतदान पार पडले होते. त्यानंतर हाती आलेल्या एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये 37 ते 40 जागांसह भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर एक्झिट पोलच्या आकड्यांवर आमचा विश्वास नाही. दिल्लीत आम आदमी पक्षच सरकार स्थापन करणार असा दावा करण्यात आला होता. त्यामुळे निकालात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
यापूर्वी 2013, 2015 आणि 2020 या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये ‘आप’ने सहज विजय मिळवला होता. त्यामुळे दिल्ली म्हणजे ‘आप’ आणि अरविंद केजरीवाल असे अलिखित समीकरण तयार झाले होते. परंतु, यंदा भाजपने दिल्ली विजय मिळवण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. देशभरातील भाजपचे आमदार, खासदार, भाजपशासित राज्यांमधील मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांसह पंतप्रधानही मैदानात उतरले होते. अशात आता सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने सरशी मारली आले आहे.