VIDEO : काँग्रेस खासदाराच्या आसनावर सापडला नोटांचा बंडल; राज्यसभेत एकच गदारोळ

VIDEO : काँग्रेस खासदाराच्या आसनावर सापडला नोटांचा बंडल; राज्यसभेत एकच गदारोळ

Bundle Of Notes Found On Congress Seat : संसदेच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान शुक्रवारी राज्यसभेत एकच गदारोळ पाहण्यास मिळाला. राज्यसभेतील (Rajya Sabha) काँग्रेसच्या जागेवर नोटांचे बंडल सापडले आहे. नोट मिळाल्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला, भाजप खासदारांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी जोरात केली. दुसरीकडे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांनीच हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितलं. तसेच या प्रकरणाची (Congress MP) आम्ही याची चौकशी करू, असं आश्वासन देखील दिलंय.

“..तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”; राऊतांनी सांगितली दिल्लीतली ऑर्डर

कॉंग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी यांच्या जागेवर हा नोटांचा बंडल सापडला आहे. यावर राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की, “मी सदस्यांना कळवू इच्छितो की काल सभागृहाचे कामकाज तहकूब झाल्यानंतर नियमित तपासणी दरम्यान सुरक्षा अधिकाऱ्यांनी सीट क्रमांक 222 मधून चलनी नोटांचा एक गठ्ठा जप्त केली. जे सध्या तेलंगणातून निवडून (Notes Found On Congress MP Seat) आलेल्या अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आलाय. ही बाब माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली. मी याची खात्री केली आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असं देखील त्यांनी सांगितलं आहे.

याप्रकरणी आपली बाजू मांडताना काँग्रेस खासदार अभिषेक सिंघवी (Viral Video) म्हणाले की, आजपर्यंत त्यांनी असं काहीही ऐकलेलं नाही. ते म्हणाले की, मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा 500 रुपयांची नोट सोबत घेऊन जातो. याबद्दल मी प्रथमच ऐकले. मी दुपारी 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो. नंतर एक वाजता उठलो अन् दीडपर्यंत कॅन्टीनमध्ये बसलो. त्यानंतर मी संसदेतून बाहेर पडलो. काँग्रेस खासदाराच्या आसनावर सापडला नोटांचा बंडल सापडल्यामुळे मात्र राज्यसभेत एकच गदारोळ झाला होता.

“..तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”; राऊतांनी सांगितली दिल्लीतली ऑर्डर

या प्रकरणावर, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, नियमित प्रोटोकॉलनुसार, सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर जागा तपासल्या गेल्या. या प्रक्रियेदरम्यान, चिठ्ठी सापडली असून सीट क्रमांक डीकोड केले गेले आहेत. त्या दिवशी सदस्यांच्या स्वाक्षरी देखील करण्यात आली, असं रिजिजू यांनी म्हटलंय. तर या प्रकरणामुळे संसदेत मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेस खासदाराच्या बाकाखालून ५०० च्या नोटांचा गठ्ठा सापडला असून या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube