नवीन आयकर विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी, जाणून घ्या करदात्यांना कसा होणार फायदा?

  • Written By: Published:
नवीन आयकर विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी, जाणून घ्या करदात्यांना कसा होणार फायदा?

New Income Tax Bill: केंद्रीय मंत्रिमंडळाने (Union Cabinet) मोठा निर्णय घेत आज (07 फेब्रुवारी) नवीन उत्पन्न कर विधेयकाला (New Income Tax Bill) मंजुरी दिली आहे. नवीन विधेयक सहा दशके जुन्या आयटी कायद्याची (IT Act) जागा घेणार आहे. यामुळे करदात्यांना मोठा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार, नवीन विधेयकाची भाषा सोपी असणार आहे ज्यामुळे लोकांना ती कर तज्ञाच्या मदतीशिवाय देखील समजू शकेल.

संसदेत सादर होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने आज नवीन विधेयकाला मंजुरी दिल्याचे आता नवीन विधेयक पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाणार आणि त्यानंतर संसदेच्या अर्थविषयक स्थायी समितीकडे पाठवले जाईल.

संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget Session) पहिला टप्पा 13 फेब्रुवारी रोजी संपत आहे. हे अधिवेशन 10 मार्च रोजी पुन्हा सुरू होईल आणि 4 एप्रिलपर्यंत चालेल. देशात 1961 मध्ये आयकर कायदा लागू करण्यात आला होता. मात्र आता लोक पैसे कमवण्याच्या पद्धतीत आणि कंपन्यांच्या व्यवसायमध्ये बदल झाल्याने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहे.

तसेच नवीन विधेयक लागू करण्याचा उद्देश भाषा आणि अनुपालन प्रक्रिया सुलभ करणे आहे. याचा अर्थ असा की नवीन कायद्यामुळे आयकर स्लॅबमध्ये बदल होण्याची शक्यता कमी आहे, कारण हे सहसा वित्त कायद्याद्वारे केले जाते.

महाराष्ट्रीतील निकालाने राहुल गांधींना 440 व्होल्ट्सचा झटका, एकनाथ शिंदेंनी लावला टोला

2010 मध्ये संसदेत ‘प्रत्यक्ष कर संहिता विधेयक, 2010’ सादर करण्यात आले होते. ते चौकशीसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आले. तथापि, 2014 मध्ये सरकार बदलल्यामुळे हे विधेयक रद्द झाले.

‘हिंदू गर्जना चषक’ महिला व पुरूष राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेस शानदार प्रारंभ

follow us
  • fb
  • instagram
  • youtube