केजरीवालांचा चार हजार मतांनी पराभव, संदीप दीक्षितांनी काढला आईच्या पराभवाचा वचपा
![केजरीवालांचा चार हजार मतांनी पराभव, संदीप दीक्षितांनी काढला आईच्या पराभवाचा वचपा केजरीवालांचा चार हजार मतांनी पराभव, संदीप दीक्षितांनी काढला आईच्या पराभवाचा वचपा](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/Delhi-Election-Results-2_V_jpg--1280x720-4g.webp)
Delhi Election Results : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे (Delhi Assembly Elections) निकाल स्पष्ट झालेत. ४८ जागांवर आघाडी घेत भाजपने (BJP) विजय निश्चित केलाय. तर आम आदमी पक्षाची (AAP) २२ जागांपर्यंत खाली घसरण झाली. इतकंच नाही तर या निवडणुकीत अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी त्यांचा पराभव केला. राजकीय जाणकारांच्या मते, केजरीवाल भाजपकडून नाही तर काँग्रेसकडून हरले आहेत.
तब्बल 27 वर्षांनी भाजपने दिल्लीचं मैदान कसं मारलं? जाणून घ्या भाजपच्या विजयाची 10 कारणं
केजरीवाल यांनी २०१३ मध्ये शीला दीक्षित यांचा पराभव करून पहिल्यांदाच या जागेवरून विजय मिळवला होता. त्यांनी शीला दीक्षित ह्यांचा २५,८६४ मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून या मतदारसंघातून केजरीवाल सलग तीनदा निवडून आले आहेत. ते चौथ्यांदा निवडणूक लढवत होते. मात्र, त्यांचा पराभव झाला. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्लीत जोरदार प्रचार केला. स्थानिक मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून प्रचार केला. त्यामुळं ते जनतेचा पाठिंबा मिळविण्यात यशस्वी झाले. केजरीवालांच्या पराभवाचा दुसरं कारणं- मतांचे विभाजन.
संदीप यांनी काढला आईच्या पराभवाचा वचपा
वास्तविक, शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित हे देखील काँग्रेसच्या तिकिटावर नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण तेही हरले. संदीप दीक्षित निवडणूक हरले असले तरी त्यांनी केजरीवाल यांचा पराभव करून आपल्या आईच्या पराभवाचा वचपा काढल्याचं बोललं जातंय.
केजरीवाल चार हजार मतांनी पराभूत
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, अरविंद केजरीवाल ४०८९ मतांनी निवडणुकीत पराभूत झाले. तर संदीप दीक्षित यांना ४५४१ मते मिळाली. जर दिल्लीत आप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली असती तर केजरीवाल निवडणूक जिंकले असते, अशी प्रतिक्रिया आता समोर येत आहेत. म्हणजे, केजरीवालांच्या विजयात संदीप दीक्षित हा सर्वात मोठा अडथळा होता, ज्याचा फायदा भाजपला झाला.
Delhi Election : 27 वर्षांचा वनवास संपला… मायक्रो प्लॅनिंगने भाजपचे दिल्लीत थाटात पुनरागमन
थोडक्यात, दिल्लीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे घटकपक्ष एकदिलाने निवडणूक लढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, काँग्रेस, आप या पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले. त्यामुळं मतांचे विभाजन झाले आणि याचा फटका आपला बसला.
आपच्या विजयाची जबाबदारी आमच्यावर नाही – कॉंग्रेस
जर काँग्रेस ‘आप’सोबत असती तर असा निकाल लागला नसता, असे आप आणि इंडिया आघाडील मित्रपक्ष सांगत आहेत. यावर सुप्रिया श्रीनेत यांनी भाष्य केलं. कोण काय म्हणतं यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. आम आदमी पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली नाही. आम्ही एनजीओ नाहीत, आम्हीही राजकीय पक्ष आहोत, श्रीनेत म्हणाले.
कोणाला किती मते मिळाली?
निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार, नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा यांना ३००८८ मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना २५९९९ मते मिळाली. काँग्रेस उमेदवार संदीप दीक्षित यांना ४५६८ मते मिळाली.