केजरीवालांना नो दिलासा! जामिनाची जनहित याचिका फेटाळत दंड ठोठावला…

केजरीवालांना नो दिलासा! जामिनाची जनहित याचिका फेटाळत दंड ठोठावला…

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) दारु घोटाळा प्रकरणी अटकेत आहेत. केजरीवाल यांना जामिन देण्याच्या विनंतीची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली असून याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही.

चिन्मय मांडलेकरच्या पत्नीच्या व्हिडीओवर किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाला, ‘मी ब्राह्मण, तो कासार..’

उत्तर प्रदेशातील कुख्यात डॉन अतिक अहमद, टिल्लू ताजपुरिया याच्या हत्येचा संदर्भ याचिकेत देण्यात आला आहे. तिहार तुरुंगात हत्या, बलात्कार, दरोडे, बॉम्ब स्फोट प्रकरणातील आरोपींना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो, जोपर्यंत केजरीवाल मुख्यमंत्री पदावर आहेत तोपर्यंत त्यांना साधारण जामिन मिळावा असं याचिकेत म्हटलं होतं. मात्र, प्रलंबित सर्व प्रकरणांमध्ये असाधारण जामीन देता येत नाही, असे सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्याला 75 हजार रुपयांचा दंड ठोठावला.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा अहमदनगरमध्ये हल्लाबोल! विरोधकांच इंजिन बंद म्हणत रावणरुपी लंकेचं दहन करण्याची टीका

केजरीवाल यांना उत्पादन शुल्क प्रकरणात चौकशीसाठी ईडीने वारंवार समन्स पाठवूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यांना ईडीने यापूर्वी 9 वेळा समन्स बजावले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर होत नव्हते. दरम्यान, ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु उच्च न्यायालयाने अटकेतून दिलासा देण्यास नकार दिला. त्यानंतर (21 मार्च) रोजी ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी पोहोचले होते. तेव्हाच त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची कुणकुण लागली होती. अखेर त्याचं दिवशी अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. हे राजकीय षडयंत्र आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेच राहतील. त्यांना तुरुंगातून सरकार चालवावे लागेल तरी हरकत नाही. मात्र, मुख्यमंत्री केजरीवालच राहणार आहेत. ईडीने अनेक छापे टाकले, पण एक रुपयाही सापडला नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही अटक करण्यात आली. हे षडयंत्र आहे, अशी प्रतिक्रिया आतिशी मार्लेना यांनी दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube