गाढ झोपेतच काळाचा घाला! लक्झरी बस अन् टेम्पो अपघातात ११ जणांचा मृत्यू
Road Accident in Rajasthan : राजस्थानातील धौलपूरमध्ये भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. येथे एका स्लीपर कोच बस आणि टेम्पोत जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात ११ लोकांचा मृत्यू झाला. मयतांमध्ये पाच मुले, तीन मुली, दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या मृतदेहांना सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या घटनेत तीन (Rajasthan News) गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात राष्ट्रीय महामार्ग ११ वरील सुनीपूर या गावाजवळ झाला. टेम्पोतील सर्व लोक बाडी शहरातील गुमट परिसरातील राहणारे आहेत. हे सर्व लोक बरेलीतील त्यांच्या नातेवाईकांचा एक समारंभ आटोपून माघारी परतत होते. या घटनेत बसचेही मोठे नुकसान झाले आहे. या वाहनांना पोलिसांनी जप्त केले आहे. टेम्पोतील लोक गाढ झोपेत असतानाच हा भीषण अपघात झाला.
Dhule Accident : पिकअप अन् ईकोचा अपघात, वाहनाचा चक्काचूर; पाच जण जागीच ठार
ज्यावेळेस हा अपघात झाला तेव्हा बस भरधाव वेगात असल्याचे सांगितले जात आहे. दोन वाहनांची धडक इतकी जोरदार होती की वाहनांची चक्काचूर झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच स्थानिकांनी धाव घेतली. जखमी लोकांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. या अपघातात काही लोक अतिशय गंभीर जखमी झाले होते. त्यांना दवाखान्यात घेऊन जात असतानाच मृत्यूने गाठले.
दरम्यान, रस्त्यांवर वाहनांचा वेग भरधाव (Road Safty) असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे. अपघातांची संख्या कमी करण्यासाठी या उपाययोजनांची गरज आहे. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे.
अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी या महामार्गावर अपघात सातत्याने होत आहेत. उपाययोजना प्रत्यक्षात अंमलात आणण्याचीही गरज आहे. परंतु त्यानुसार कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत चालली आहे. या अपघातात निष्पाप लोकांचा मात्र जीव जात आहे. या अपघातांच्या प्रमाणावर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे.
Haryana Accident: ऐन दसऱ्याच्या दिवशी भीषण अपघात, कार कालव्यात कोसळ्याने 7 जणांचा मृत्यू