Video : मोदींना स्टॅडिंग ओव्हेशन देताना गडकरी खरचं उभे राहिले नाही का?; नेमकं सत्य काय…

  • Written By: Published:
Video : मोदींना स्टॅडिंग ओव्हेशन देताना गडकरी खरचं उभे राहिले नाही का?; नेमकं सत्य काय…

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आज (दि.7) संविधान भवनमधील सेंट्रल हॉलमध्ये नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नावाला NDA आघाडीतील नेत्यांनी एकमताने पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यावेळी मोदींचे संविधान भवनमध्ये स्वागत करण्यात आले त्यावेळी NDA सर्व खासदारांसह अन्य उपस्थितांनी मोदींना स्टॅडिंग ओव्हेशन दिले. पण माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे काही उभे राहिले नाही. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण खरचं मोदींचे स्वागत करताना गडकरी उभे राहिले नाही का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचं नेमकं सत्य काय? हेच आपण जाणून घेऊया. (Did Nitin Gadkari Really Not Stand Up For Standing Ovation To Narendra Modi)

NDA आघाडी देशाच्या इतिहासातील यशस्वी युती असेल; विजयी खासदारांना मोदींनी दिला ‘कानमंत्र’

संविधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये नेमकं काय घडलं?

4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचा निकाल समोर आला. यात भाजपचे उमेदवार 240 जागांवर विजयी झाले. केंद्रात एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 272 चे संख्याबळ आवश्यक असते. मात्र, यावेळी भाजपला 240 जागा मिळाल्याने आता NDA आघाडीसोबत एकत्र येत सत्ता स्थापन करणार आहे. त्यासाठी आज दिल्लीत NDA आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला ज्यावेळी मोदींचे आगमन झाले त्यावेळी उपस्थितांनी मोदी मोदी नावाच्या घोषणा देत त्यांचे उभे राहून स्वागत करण्यात आले. या स्वागताचे मोदींनीही हात जोडून आभार मानले.

Video : एकच खासदार तरीही दिल्लीत अजितदादांचा दबदबा; मिळाला ‘स्पेशल’ मान

मोदींनी संविधानाला केले नमन

उपस्थित नेत्यांकडून स्वागत स्वीकारल्यानंतर मोदींनी पुढे जात सभागृहात ठेवलेल्या संविधानाला वाकून नमस्कार केला. यावेळी भारत माता की जय आणि वंदे भारतच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मोदी मुख्य मंचाकडे गेले. तेथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार आणि टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यासह अन्य नेत्यांनी मोदींचे स्वागत केले.

Video : चार वेळा वदवून सांगितलं सोबत राहू; ‘पलटू पंटर’ नितीश कुमारांनी गाजवली NDA ची बैठक

हे सर्व सुरू असेपर्यंत सभागृहातील प्रत्येक नेते उभे होते. त्यानंतर काही नेते खाली बसले. यात नितीन गडकरींचाही समावेश होता. त्याचवेळी निवेदन करणाऱ्या व्यक्तीने भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मोदींचे गमछा आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याची विनंती केली. त्यावेळी खाली बसलेले नेते पुन्हा उठले आणि त्यांनी टाळ्या वाजवण्यास सुरूवात केली. यात पहिल्या रांगेत बसलेले पियुष गोयल , माजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह माजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि खुद्द नितीन गडकरीदेखील उभे राहून टाळ्या वाजवत असल्याचे संसद टिव्हीच्या व्हिडिओमध्ये क्लिअर दिसून येत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काय?

संसद टिव्हीच्या व्हिडिओमध्ये सुरूवातीला गडकरी खाली बसलेले दिसून येत आहेत. पण जेव्हा त्यांच्या बाजूला बसलेले नेते टाळ्या वाजवण्यासाठी उभे रहिले त्यावेळी गडकरीदेखील क्षणाचाही विलंब न करत उभे राहिले. पण, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये गडकरी मोदींच्या सत्कारावेळी उभे राहिले नाही असे दाखवले जात आहे. प्रत्यक्षात व्हायरल होणार हा व्हिडिओचा अँगल केवळ समोरील बाजूनेच दाखवण्यात आला आहे. पण जर हा व्हिडिओ संसद टिव्हीच्या  यू ट्यूब चॅनलला बघितल्यास गडकरी मोदींच्या स्वागतावेळी उभे राहिलेले स्पष्टपणे दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज