टार्गेट पूर्ण होईपर्यंत ना वॉशरूम ना पाणी प्यायचे; ॲमेझॉनमध्ये कर्मचाऱ्यांना घ्यायला लावली अजब शपथ

टार्गेट पूर्ण होईपर्यंत ना वॉशरूम ना पाणी प्यायचे; ॲमेझॉनमध्ये कर्मचाऱ्यांना घ्यायला लावली अजब शपथ

Amazon Employees : हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथी ॲमेझॉन कंपनीने अजब नियम आपल्या कर्मचाऱ्यांना लागू केला आहे. या कंपनीने मोठ टार्गेट कंपनीतील कर्मचाऱ्यांना दिलं आहे. दरम्यान, ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी ज्या अटी ठेवल्या आहेत त्या वाचून किंवा ऐकून तुम्ही हैराण व्हालं. (Amazon) हे टार्गेट पूर्ण करताना कर्मचाऱ्यांना शौचालयास, पाणी पिण्यास किंवा जेवणासाठी जाण्याच बंदी घालण्यात आली आहे. हरियाणातील एका कर्मचाऱ्यासोबत अशी घटना घडली. (Amazon Employees ) ही घटना लोकांना माहिती झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय.

ब्रेकशिवाय काम करतो   Mirzapur Season मिर्झापूर  मध्ये कोणाची सत्ता? रिलीज डेट विषयी मोठा खुलासा

येथे, 16 मे रोजी, 24 वर्षीय कामगाराला 30 मिनिटांच्या चहाच्या ब्रेकनंतर शपथ घ्यायला लावली. त्यामध्ये सहा ट्रकमधून माल उतरवायचा होईपर्यंत शौचालय, पाणी पिण्यास किंवा जेवणास जाणार नाही अशी प्रतिज्ञा करायला लावली. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, हरियाणातील मानेसरमध्ये असलेल्या 5 गोदामांपैकी एका गोदामात ही घटना घडली आहे. या प्रकरणी येथील एक 24 वर्षीय कामगार म्हणाला, आम्ही प्रत्येकी 30 मिनिटांच्या जेवणाच्या आणि चहाच्या ब्रेकसह कोणत्याही ब्रेकशिवाय काम करत असलो तरी, आम्ही एका दिवसात चारपेक्षा जास्त ट्रक उतरवू शकत नाही. मात्र, जास्त कामाचा फोर्स केला जातो. त्यामधूनच अशा प्रतिज्ञा करायला लावतात असंही तो म्हणाला आहे.

पगार 10 हजार देतात

पुढे बोलताना हा कर्मचारी म्हणाला, आम्हाला जेवण्यासाठी आणि चहा घेण्यासाठी ब्रेक आहे. दिवसातून कधी टॉयलेटला, बाथरुमला जाणं होत. परंतु, हे लोक आम्हाला स्वच्छतागृह किंवा इतर ठिकाणी चेक करतात. हे टाईमपास करत आहेत का? परंतु, आम्ही असा कुठलाही टाईमपास करत नाही. तसंच, एकाचवेळी माल उतरवत असताना गाडी गरम होते म्हणून कधी थोडी विश्रांती घेतो. परंतु, हे गाडीसमोरच उभा असल्याने आम्हाला त्याचा मोठा त्रास होतो असंही तो कर्मचारी म्हणाला आहे. तसंच, पाच दिवसांच्या आठवड्यात प्रत्येक दिवशी 10 तास इतक काम करून घेतात आणि पगार 10 हजार देतात अशी खंतही त्याने बोलून दाखवली.

शपथ दररोज घेतली जाते

गेल्या महिन्यात, या गोदामातील “इनबाउंड टीम” ने सुमारे 8 वेळा शपथ घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेषत: कामात व्यस्त असतानाही कर्मचाऱ्यांना शपथ घ्यावी लागत असल्याचंही पुढं आलं. यामध्ये “आउटबाउंड टीम” ला त्यांना जे टार्गेट दीलं आहे ते पूर्ण करण्याची रोज त्यांना अठवण करून दिली जाते. त्यामुळे या घटनेची सर्वत्र आता चर्चा होत आहे. दरम्यान ॲमेझॉनने याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही या गोष्टीची चौकशी करत आहोत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत असं कधी वागत नाहीत. जर आम्हाला अशी कोणतीही घटना कळली असती तर तात्काळ थांबवू आणि त्याची चौकशी करून कारवाई करू असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube