लाडू वादाचा भक्तांवर परिणाम शू्न्य? चारच दिवसांत तब्बल ‘इतके’ लाडू केले खरेदी..

लाडू वादाचा भक्तांवर परिणाम शू्न्य? चारच दिवसांत तब्बल ‘इतके’ लाडू केले खरेदी..

Tirupati Laddu Controversy : आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात जनावरांची (Tirupati Laddu Row) चरबी असल्याचे उघड झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. या प्रकरणी रोजच नवनवीन खुलासे होत आहेत. हिंदू संघटना आणि संत समाज या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहे. मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी गठीत केली आहे. दुसरीकडे तिरुपती बालाजी मंदिरात (Tirupati Balaji) शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या सगळ्या गोष्टी घडत असताना आणखी एक बातमी समोर आली आहे.

मंदिरातील प्रसादाबाबत इतका मोठा वाद उफाळून आल्यानंतरही भक्तांनी लाडू प्रसादाची तुफान खरेदी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील चार दिवसांत भक्तांनी तब्बल 14 लाख लाडू खरेदी केले आहेत. या गोष्टीला तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा आणखी काही नाव द्या पण येथे येणाऱ्या भक्तांवर या वादाचा परिणाम झाला नाही असे दिसून येत आहे.

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींनी यांनी सत्ताधारी तेलुगू देसम पक्षावर गंभीर आरोप केले. टीडीपीकडून धार्मिक मुद्द्यांवर राजकारण करत असल्याचे रेड्डी म्हणाले होते. मात्र भक्तांवर या वादाचा काहीच परिणाम झाल्याचे दिसत नाही. जे झालं ते आता भुतकाळात गोष्ट झाली असेही अनेक भक्तांचे म्हणणे आहे. मागील चार दिवसांची लाडू विक्रीची आकडेवारी पाहिली तर 19 सप्टेंबर या दिवशी 3.59 लाख, 20 सप्टेंबरला 3.17 लाख, 21 सप्टेंबरला 3.67 लाख आणि 22 सप्टेंबरला 3.60 लाख लाडूंची विक्री देवस्थानने केली आहे.

 तिरुपती लाडू वादानंतर ओडिशा सरकार सतर्क, जगन्नाथ मंदिरासाठी उचललं मोठे पाऊल

200 वर्षांपासूनची परंपरा

तिरुपती बालाजी मंदिरात या खास पद्धतीचे लाडू मिळतात. प्रसादाशिवाय भगवान बालाजीचं दर्शन पूर्ण होत नाही असे मानले जाते. मंदिरातील लाडू तयार करण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. लाडू तयार करताना स्वच्छतेची अतिशय काळजी घेतली जाते. लाडू तयार करण्यासाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह आहे. प्रसाद तयार करण्यासाठी आधी लाकडांचा वापर केला जात होता. 1984 पासून एलपीजी गॅसचा वापर करण्यात येत आहे. याठिकाणी दररोज आठ लाख लाडू तयार केले जातात.

कसा तयार केला जातो लाडू प्रसाद

तिरुपती बालाजी मंदिरात तयार केला जाणारा लाडू प्रसाद खास पद्धतीने तयार केला जातो. याला दित्तम असेही म्हटले जाते. हा प्रसाद तयार करण्यासाठी बेसन, काजू, सुकामेवा, खडीसाखर, तूप, विलायची वापरतात. आतापर्यंत दित्तममध्ये फक्त सहा वेळा बदल करण्यात आले आहेत. दररोज प्रसाद तयार करण्यासाठी दहा टन बेसन, दहा टन साखर, 700 किलो काजू, 150 किलो विलायची, 300 ते 400 लीटर तूप, 500 किलो खडीसाखर, 540 किलो मनुके या पदार्थांचा वापर केला जातो. या पद्धतीने लाडू प्रसाद तयार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Tirupati Controversy : तिरुपती ‘लाडू’त चरबी! जाणून घ्या, कसा तयार केला जातो लाडू प्रसादम्..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube