राम मंदिर सोहळ्याला हजेरी; इमाम संघटनेच्या प्रमुखालाच काढला फतवा
News Delhi : अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी अयोध्या राम मंदिर ट्रस्टकडून देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं होतं. या सोहळ्याला ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख डॉ. इमाम उमर अहमद इलियासी (Ahmed Iliyasi) यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर रविवारी या संघटनेकडून अहमद इलियासी यांच्याविरोधात फतवा काढण्यात आला आहे.
लोकसभेपूर्वीच राज्यसभेचे धुमशान : महाराष्ट्रासह 15 राज्यांतील 56 जागांसाठी निवडणूक जाहीर
यावर बोलताना इमाम अहमद इलियासी म्हणाले, राम मंदिर घटनेपासूनच मला धमक्या येत होत्या. हा फतवा रविवारी जारी करण्यात आला होता मला 22 जानेवारीच्या संध्याकाळपासून धमकीचे कॉल येत होते. मी काही कॉल रेकॉर्ड केले आहेत ज्यात कॉल करणाऱ्यांनी मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या, असल्याचा आरोपही अहमद इलियासी यांनी केला आहे.
Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर ‘’फाइटर’’चा धुमाकूळ, चौथ्या दिवशी 100 कोटींची कमाई
जे माझ्यावर प्रेम करतात, देशावर प्रेम करतात ते मला साथ देतील. समारंभात सहभागी होण्यासाठी माझा तिरस्कार करणाऱ्यांनी पाकिस्तानात जावं. मी प्रेमाचा संदेश दिला आहे, मी कोणताही गुन्हा केलेला नाही… मी माफी मागणार नाही किंवा राजीनामा देणार नाही, ते त्यांना हवे ते करू शकतात, असा इशाराच इमाम अहमद इलियासी यांनी दिला आहे.
Nitish Kumar यांची पहिलीच वेळ नाही; 1974 पासून कधी आरजेडी कधी भाजप तळ्यात-मळ्यात सुरूच
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदचा जुना वाद अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने मिटला आहे. जेव्हापासून हा वाद झाला तेव्हापासून अयोध्येतील राम मंदिर आणि बाबरी मस्जिदसंदर्भात संवेदनशीलता बाळगण्यात येत होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर आता हे काम पूर्णत्वास येत असून येत्या 22 जानेवारील रोजी अयोध्येत रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे.