17 वर्षांपुर्वीच्या कॅशकांडातून माजी न्यायाधीशांची निर्दोष मुक्तता; जस्टिस यशवंत वर्मांना दिलासा मिळणार?

Former judges acquitted in cash scam Will Justice Yashwant Verma get relief : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात (Yashwant Varma) मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यानंतर हे न्यायाधीश साहेब चर्चेत आले आहेत. मात्र याच दरम्यान सतरा वर्षांपूर्वीच्या अशाच एका रोख रकमेबाबतच्या प्रकरणांमध्ये एका माजी न्यायाधीशांना निर्दोष मुक्त करण्यात आलं आहे. त्यामुळे आता त्याचप्रमाणे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना देखील दिलासा मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
13 ऑगस्ट 2008 रोजी निर्मलजीत कौर यांच्या निवासस्थानी राहत असलेल्या लिपिकाला एका प्लास्टिकच्या पिशवीत फिरले पंधरा लाख रुपये मिळाले. यांच्या निवासस्थानी पोहोचवायचे होते मात्र नाम साधर्म्यामुळे ती चुकून निर्मलजीत कौर यांच्या घरी पोहोचवले गेली. अशी माहिती कोर यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना आणि चंदिगड पोलिसांना दिली होती.
त्यानंतर या प्रकरणी एफ आय आर दाखल करण्यात आला आणि तपास सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आला. त्यावेळी चौकशी दरम्यान न्यायमूर्ती कौर नाही तर यादव यांच्याविरुद्ध खटला चालवण्याची परवानगी देण्यात आली. यासाठी सरकारी वकिलांनी 84 साक्ष नोंदवल्या. तरी देखील सीबीआय या प्रकरणामध्ये आतापर्यंत ठोस पुरावे सादर करून न शकल्याने विशेष न्यायालयाने नुकतेच न्यायमूर्ती निर्मल यादव यांच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.
काय आहे जस्टीस यशवंलत वर्मांचे प्रकरण ?
दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) एका न्यायाधीशांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळं हे न्यायाधीश साहेब चर्चेत आलेत. हे प्रकरण (Delhi High Court Judge) आहे, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या (Yashwant Verma) संदर्भातील. अलीकडेच दिल्लीतील त्यांच्या सरकारी बंगल्यात आग लागली होती.
म्यानमार आणि थायलंडमध्ये मृत्यूचं तांडव; मदतीसाठी धावलं भारताचं ‘ऑपरेशन ब्रह्मा’, पाहा फोटो
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाला आग विझवताना त्याच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली. बंगल्यात एवढी मोठी रक्कम पाहून कर्मचारी थक्क झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची माहिती दिली. मात्र, जेव्हा हे प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले, तेव्हा एकच गोंधळ उडाला.