G20 : नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र नेमकं काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत

  • Written By: Published:
G20 : नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र नेमकं काय? जाणून घ्या सोप्या शब्दांत

What Is New Delhi Leaders Declaration : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या G20 शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्राला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे जगभरात भारताचा डंका वाजणार असून, G20 चा संयुक्त जाहीरनामा उद्या म्हणजेच रविवारी प्रसिद्ध केला जाणार आहे. पण, आज G20 परिषदेत मंजुर करण्यात आलेला नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्र नेमकं काय आहे हे सोप्या शब्दांत जाणून घेऊया.

‘बायडेन यांना भारतात आणण्यासाठी 12 हजार कोटी मोजले का’? प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सवाल

आज मंजूर करण्यात आलेल्या नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्रात दहशतवाद, महागाई, युक्रेन युद्ध अशा एकूण 112 मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला G20 सदस्य देशांनीही एकमताने मान्यता दिली आहे, हे भारताचे मोठे यश मानले जात आहे. जाहीरनाम्यात कोणत्याही स्वरूपातील दहशतवाद स्वीकारार्ह नसेल. यासोबतच दहशतवादी गटांना आश्रय देणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

Video : बायडन यांचा हात धरला; अनेकांसोबत फोटो काढले; कोणार्क चक्राचे महत्त्व काय?

यासोबतच सर्व देशांना संयुक्त राष्ट्रांच्या सनदेनुसार काम करण्याचे आवाहन करण्यात आले असून, आजचे युग युद्धाचे नसल्याचेही सांगण्यात आले आहे. याशिवाय जगातील शांततेसाठी सर्व धर्मांची बांधिलकी स्वीकारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवी दिल्ली लीडर्सच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धाचा उल्लेख करण्यात आला असून, संपूर्ण घोषणापत्रात युक्रेनचे नाव पाच वेळा घेण्यात आले आहे. तर दहशतवाद हा शब्द 9 वेळा वापरण्यात आला आहे. यासोबतच कोणत्याही देशाच्या अखंडतेवर आघात होता कामा नये आणि ते मान्य केले जाऊ नये, असेही म्हटले आहे.

G20 मधील नवी दिल्ली लीडर्स मॅनिफेस्टोमधील महत्त्वाचे मुद्दे

आज मंजूर करण्यात आलेल्या घोषणापत्रात अण्वस्त्रांचा वापर किंवा धोका अस्वीकार्य असल्याचे तसेच यूएनएससी आणि यूएनजीएमधील देशांच्या स्वीकारलेल्या ठरवांचा पुनरुच्चार करण्यात आला आहे. सर्व देशांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचे पालन करण्याचे आणि प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घोषणापत्रात दहशतवादाला आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी गंभीर धोका असल्याचे म्हटले आहे.

G20 Summit : जगात विश्वासाचे संकट; PM मोदींकडून जगभरातील नेत्यांना ‘सबका साथ…’ चा मंत्र

G20 घोषणापत्र मजबूत शाश्वत समावेशक वाढीवर केंद्रित असून, यामध्ये हरित मार्गाची संकल्पना करण्यात आली असून, G20 अध्यक्षपदाच्या संदेशात एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य असल्याचे सांगण्यात आले आहे. युक्रेन युद्धाचाही घोषणापत्रात उल्लेख करण्यात आला असून, यामुळे जगभरात महागाई वाढल्याचे सांगण्यात आले आहे. युक्रेन युद्धाचा संपूर्ण जगावर नकारात्मक परिणाम झाल्याचाही उल्लेख यात करण्यात आला आहे.

G20 शिखर परिषदेच्या संबोधनातही पंतप्रधानांनी ‘इंडिया’चा वापर टाळला; म्हणाले भारत…

याशिवाय नवी दिल्ली लीडर्स घोषणापत्रात वादग्रस्त प्रश्न शांततेत सोडवण्याचे आवाहन करण्यात आले असून, दहशतवादी गटांना आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. याशिवाय, FATF च्या वाढत्या संसाधनांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वचनबद्धता व्यक्त करण्यात आली आहे. मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून वादांवर शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube