दिल्लीत कचरा विक्रेता…दुसऱ्या बायकोला भेटायला थेट पाकिस्तानात, हेरगिरी प्रकरणातील 14 वा आरोपी कोण?

Garbage seller in Delhi Went to Pakistan to meet second wife : युट्युबर ज्योती मल्होत्राच्या (Jyoti Malhotra) हेरगिरी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे चालला आहे, तसतसे नवनवीन खुलासे होत आहेत. हे हेरगिरीचं जाळं आता हरियाणा-पंजाबपासून उत्तर प्रदेश-दिल्लीपर्यंत पसरलं असल्याचं देखील समोर आलंय. यूपी एटीएसने दिल्लीतून एका आरोपीलाही (Pakistan) अटक केलीय.
युट्यूबर ज्योती मल्होत्रा (Operation Sindoor) पाकिस्तानी व्हिसासाठी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात पोहोचताच, तिथे लावलेल्या सापळ्यात ती अडकली. तिथे तैनात असलेला व्हिसा अधिकारी दानिश हा प्रत्यक्षात आयएसआय एजंट होता, त्याला पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या आदेशानुसार भारतात स्लीपर सेल तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ज्योती मल्होत्राला अडकवणारा आयएसआय एजंट दानिश याला बदललेल्या नाव आणि पत्त्यासह पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या व्हिसा डेस्कवर ठेवण्यात आले. त्याचा व्हिसा 21 जानेवारी 2022 रोजी तयार झाला (Garbage seller in Delhi) होता. व्हिसावरील नाव एहसान-उर-रहमान आहे. दानिशप्रमाणेच आबिद आणि ताहिर हुसेन यांनाही व्हिसा चाचणीसाठी आणण्यात आलंय. याचं रहस्य मिलिटरी इंटेलिजेंसने स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड झालंय.
डोनाल्ड ट्रम्प यांची अॅपल सीईओ टिम कुक यांना धमकी, भारतात उत्पादन IPhone वर लागणार 25% टॅरिफ
नंतर दोघांनाही अटक करून पाकिस्तानला परत पाठवण्यात आलं. राणा मोहम्मद झिया नावाच्या एजंटचे रहस्य 2021 मध्ये उघड झालं होतं. आयएसआय त्याला उच्चायुक्तालयातील व्हिसा डेस्कवर आणून स्लीपर सेल तयार करत होते. उच्चायुक्तालय हे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यासाठी आहे परंतु पाकिस्तानने नेहमीच ते कट रचण्याचा अड्डा बनवले आहे आणि त्याचा वापर हेरगिरीसाठी केला आहे. आयएसआयचा गड येथे निर्माण झाला.
मिळालेल्या माहितीनुसार आयएसआय येथे बनावट नावे आणि पत्त्यांसह कर्मचाऱ्यांची भरती करते. मग तो व्हिसा अधिकारी असो, ड्रायव्हर असो, क्लर्क असो किंवा स्वयंपाकी असो. हे सर्व आयएसआय एजंट आहेत. त्यांचे काम भारतात स्वतःचे नेटवर्क तयार करणे आणि हेरांची फौज उभारणे आहे. म्हणूनच भारताने अलिकडेच पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली अन् प्रत्येक संशयिताला परत पाठवले.
जी.एस. महानगर सहकारी बँकेची निवडणूक रंगात; सासू-सुना एकमेकींविरोधात
हेरगिरी प्रकरणात आतापर्यंत 14 जणांना अटक करण्यात आलीय. शेवटची अटक दिल्लीतून झाली जिथे यूपी एटीएसने हारूनला दिल्लीतील सीलमपूर येथून अटक झाली होती. हारून पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात होता. पंजाबमधून सर्वाधिक 7 जणांना अटक करण्यात आली, तर हरियाणामधून 5 जणांना अटक करण्यात आली. यात युट्यूबर ज्योती मल्होत्राचाही समावेश आहे. यूपी एटीएसने दोघांना अटक केली.