‘या’ तीन देशांतील लोकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

‘या’ तीन देशांतील लोकांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; पासपोर्टशिवाय भारतात राहण्याची मुभा

CAA New Rules : केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. धार्मिक त्रास आणि अत्याचारापासून वाचण्यासाठी शेजारील देशांतून भारतात आलेल्या लोकांसाठी हा निर्णय आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश या तीन देशांतून 31 डिसेंबर 2024 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, जैन, पारशी आणि ख्रिश्चन धर्मियांना पासपोर्ट किंवा अन्य आवश्यक कागदपत्रे नसली तरी भारतात राहता येणार आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेनुसार मागील वर्षात लागू झालेल्या नागरकिता अधिनियम (सीएए) नुसार 31 डिसेंबर 2024 रोजी किंवा त्याआधी भारतात आलेल्या अल्पसंख्यांक लोकांना भारताची नागरिकता प्रदान करण्यात येईल. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीन देशांतून आलेल्या हिंदू, जैन, शीख, ख्रिश्चन आणि पारशी लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या देशांतील नागरिक अनेक वर्षांपासून भारतात राहत आहेत. या तिन्ही देशांत त्यांना प्रचंड धार्मिक अत्याचार सहन करावा लागला.

सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व देण्यास सुरूवात, 14 जणांना मिळालं नागरिकत्व; गृहमंत्रायलाची माहिती

येथील सरकारांनीही अल्पसंख्यक लोकांच्या संरक्षणासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत. अत्याचार करणाऱ्यांना सोडून या अत्याचारग्रस्त लोकांवरच कारवाई होत होती. पाकिस्तान आणि बांग्लादेशात तर हिंदुंचे धर्मांतर आणि त्यांच्या मुलींना पळवून नेऊन बळजबरीने विवाह लावून देण्याचे प्रकार तर अजूनही घडत आहेत. या त्रासाला कंटाळून या तिन्ही देशांतील हिंदुंसह अन्य धर्मांचे लोक भारतात आश्रयाला येत आहेत. याच लोकांसाठी आता केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारच्या आदेशात नेमकं काय

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार अफगाणिस्तान, बांग्लादेश आणि पाकिस्तानातील हिंदू, शीख, जैन, पारशी आणि ख्रिश्चन ज्यांनी धार्मिक उत्पीडन आणि त्याच्या भीतीने भारतात आश्रय घेतला तसेच 31 डिसेंबर 2024 पर्यंत किंवा त्याआधी कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला अशा लोकांना पासपोर्ट आणि व्हिजाच्या नियमातून सूट देण्यात आली आहे.

नेपाळ अन् भूतानच्या नागरिकांसाठी कोणता नियम

नेपाळ आणि भूतानच्या नागरिकांना भारतात येण्याजाण्यासाठी किंवा येथे राहण्यासाठी पासपोर्ट किंवा व्हिजाची गरज नाही. फक्त या लोकांना भारतात बॉर्डरमार्गे प्रवेश केला पाहिजे अशी अट आहे. जर एखादी नेपाळी किंवा भूतानचा नागरिक चीन, मकाऊ, हाँगकाँग, पाकिस्तान या देशांतून भारतात आलेला असेल तर मात्र त्याच्याकडे पासपोर्ट असला पाहिजे. याच पद्धतीने भारतीय नागरिकांनाही नेपाळ आणि भूतानमध्ये जाण्यायेण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता नाही. परंतु नेपाळ किंवा भूतान व्यतिरिक्त अन्य कोणत्याही देशांतून भारतात परतत असाल तर पासपोर्ट दाखवावा लागेल.

मोठी बातमी! लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही वक्फ विधेयक मंजूर; विरोधात किती मते?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube