भारतीयांचा अपमान! हातापायांत चक्क बेड्या, व्हायरल फोटोचं सत्य मात्र वेगळंच; जाणून घ्याच!

भारतीयांचा अपमान! हातापायांत चक्क बेड्या, व्हायरल फोटोचं सत्य मात्र वेगळंच; जाणून घ्याच!

Indians Deported to India : अमेरिकेचे सैन्य विमान 104 अवैध अप्रवासी भारतीयांना घेऊन पंजाब राज्यातील अमृतसर येथे दाखल झाले. विमान लँड होताच सोशल मीडियावर एक पोस्ट वेगाने व्हायरल होऊ लागली आहे. विमान प्रवासात या भारतीयांच्या हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या आणि अपमानित करण्यात आले असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आलाय. या पोस्टची दखल सरकारने घेतली असून स्पष्टीकरण दिले आहे. सरकारने स्पष्टीकरण दिल्याने व्हायरल पोस्टमधील खोडसाळपणा सर्वांसमोर आला आहे.

पीआयबी फॅक्ट चेकनुसार सोशल मीडियावर अनेक बनावट अकाउंटवरून एक फोटो शेअर केला जात आहे. या फोटोत विमानातील प्रवाशांच्या बेड्या दिसत आहेत. त्यांचे पाय साखळदंडाने बांधलेले दिसत आहेत. परंतु, फॅक्ट चेकमध्ये वेगळेच सत्य समोर आले. सोशल मिडियावर शेअर होणारा फोटो अप्रवासी भारतीयांशी संबंधित नाही. खरं तर हा फोटो ग्वाटेमालातील निर्वासि लोकांना दाखवत आहे.

व्हायरल पोस्टवर काँग्रेसही गोंधळात

या फोटोवर काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेतून भारतीयांना हातात बेड्या टाकून आणि अपमानित करून निर्वासित केल्याचे फोटो पाहून एक भारतीय म्हणून दुःख होते. डिसेंबर 2013 ची घटना अजूनही स्मरणात आहे. ज्यावेळी भारतीय राजनयिक देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकेत बेड्या घालण्यात आल्या होत्या. विदेश सचिव सुजाता सिंह यांनी अमेरिकी राजदूत नॅन्सी पॉवेल यांच्याकडे विरोध नोंदवला होता. यूपीए सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता. मीरा कुमार, सुशील कुमार शिंदे आणि राहुल गांधी यांनी अमेरिकी काँग्रेसच्या प्रतिनिधीमंडळाला भेटण्यास नकार दिला होता असे पवन खेडा यांनी सांगितले.

आता हा फोटो भारतीय नागरिकांचा नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील (Congress Party) ज्येष्ठ नेते सुद्धा सोशल मीडियावर फिरणाऱ्या पोस्ट, फोटो खरे आहेत की नाही याची कोणतीच शहानिशा न करता प्रतिक्रिया देत असल्याचे स्पष्ट होत आहे.

भारतीयांना अमेरिकेची भुरळ! दरवर्षी लाखो भारतीय सोडताहेत मायदेश; कारणंही धक्कादायक

काय दावा केला जातोय?

अमेरिकी विमानातून भारतात आणलेल्या 104 निर्वासितांत सहभागी जसपाल सिंह यांनी दावा केला की प्रवासात त्यांच्या हातात आणि पायांत बेड्या बांधल्या होत्या. अमृतसर विमानतळावर विमान उतरल्यानंतर साखळदंड काढण्यात आले. गुरुदासपूर जिल्ह्यातील हरदोरवाल गावातील जसपाल सिंह यांनी सांगितले की 24 जानेवारी रोजी अमेरिकी सीमा पार केल्यानंतर त्यांना अमेरिकी सीमा निगराणी पथकाने पकडले होते. आम्हाला वाटले होते की दुसऱ्या एखाद्या शिबिरात आम्हाला नेण्यात येईल. तेव्हा एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की तुम्हाला भारतात घेऊन जाण्यात येत आहे. आम्हाला बेड्या घालण्यात आल्या आणि पायांतही साखळदंड टाकण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube