काय सांगता! भारतात ‘या’ कामासाठी होतोय AI चा सर्वाधिक वापर; रिपोर्टमध्ये खुलासा

काय सांगता! भारतात ‘या’ कामासाठी होतोय AI चा सर्वाधिक वापर; रिपोर्टमध्ये खुलासा

Microsoft Survey on AI : मायक्रोसॉफ्टने सेफर इंटरनेट डे निमित्ताने (Safer Internet Day) आपल्या ग्लोबल ऑनलाईन सेफ्टीसर्वे 2025 रिपोर्ट जारी केला आहे. या अहवालात भारत आणि जगभरात एआय तंत्रज्ञानाच्या वापराबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार भारतात जनरेटिव्ह एआयचा वापर वाढला आहे. या रिपोर्टसाठी 19 जुलै ते 9 ऑगस्ट 2024 दरम्यान एक वेब सर्वे करण्यात (Microsoft Survey) आला होता. या सर्वेत 15 देशांतील 14 हजार 800 मुलांनी सहभाग घेतला होता. या मुलांचे वय 6 ते 17 दरम्यान होते. विशेष म्हणजे भारतात AI चा वापर ग्लोबल एव्हरेजच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त वेगाने वाढला आहे.

AI चा सर्वाधिक वापर कोण करतंय

भारतात AI तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर भाषांतर, प्रश्नांची उत्तरे शोधणे, कामातील अचूकपणा वाढवणे, मुलांच्या शाळेच्या कामात मदतीसाठी केला जात आहे. ग्लोबल ट्रेंड प्रमाणेच भारतातही AI च्या चुकीच्या वापराबाबत भारतातही काळजी व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये ऑनलाईन फसवणूक, डीपफेक आणि AI स्कॅमबाबतीत काळजी व्यक्त करण्यात येत आहे.

ChatGPT vs Bard : AI स्पर्धेत गुगल मायक्रोसॉफ्टची शर्यत, एआय सर्च इंजिनला मारेल का?

ग्लोबल ऑनलाईन सेफ्टी सर्वेनुसार यामध्ये सहभागी होणारे 65 टक्के लोकांनी AI चा वापर केलेला आहे. 2023 वर्षाच्या तुलनेत हा वापर 26 टक्के जास्त आहे. मिलेनियलस सर्वाधिक AI चा वापर करत आहेत. जवळपास 84 टक्के मिलेनियलस एआयचा वापर करत आहेत.

कोणत्या कामांसाठी होतोय AI चा वापर

या सर्वेत भाग घेणाऱ्या 62 टक्के लोकांनी मान्य केले आहे की ते अगदी सहजपणे या तंत्रज्ञानाचा वापर करतात. 69 टक्के लोक AI चा वापर ट्रांसलेशनसाठी करतात. 67 टक्के लोक विविध प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करतात. 66 टक्के लोक कामातील अचूकपणा वाढविण्यासाठी तसेच 64 टक्के लोक मुलांना शाळेच्या कामात मदत करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

‘या’ ठिकाणी वाढतोय धोका

76 टक्के लोक असेही आहेत ज्यांना वाटते की AI मुळे ऑनलाईन शोषण वाढू शकते. 74 टक्के लोकांना डीपफेक, 73 टक्के लोकांना फसवणूक आणि 70 टक्के लोकांना हॅलोसिनेशनची भीती वाटते. 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून AI च्या वापरावर चिंता व्यक्त केली. तंत्रज्ञान प्रगत होत असले तरी त्याचे धोकेही समोर येऊ लागले आहेत.

सावधान! डीपसीकमुळे पर्सनल डेटा धोक्यात; ‘या’ संस्थेने केली धक्कादायक माहिती उघड..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube