मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा नवा फतवा; म्हणाले, कर्नाटकमध्ये राहणाऱ्यांनी कन्नड शिकावी; इतर भाषांचा वापर…
Karnataka CM Siddaramaiah : मराठी भाषेचं महाराष्ट्रात पतन होत असताना आपण पाहतोय. (Manoj Jarange) परंतु, इतर राज्य त्यांची भाषा जतन करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. कर्नाटक हे राज्य मातृभाषेसाठी पूर्वीपासून आग्रही असल्याचं अनेकदा दिसलं आहे. (Siddaramaiah) सीमावर्ती भागातील मराठी बांधवांनी कन्नडमध्येच व्यवहार करावेत, यासाठीही अनेकदा तिथं संघर्ष पाहायला मिळाला आहे.
भूवनेश्वरी मातेच्या पुतळ्याचं उद्घाटन
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाषेबद्दल मोठ विधान केलं आहे. सिद्धरामय्या म्हणाले, कन्नडीगांनी आपल्या भाषेचा अभिमान बाळगला पाहीजे. यासाठी राज्यातील प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलले पाहीजे, इतर दुसऱ्या भाषांचा वापर करू नये, असं आवाहन सिद्धरामय्या यांनी केलं आहे. कर्नाटक विधिमंडळाच्या पश्चिम द्वाराजवळ उभारण्यात आलेल्या नाददेवी भूवनेश्वरी मातेच्या पुतळ्याचं उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
मातृभाषेत संवाद साधला जातो …तर आम्हाला राजकारणात उतरावं लागेल; ‘ही’ नवी मागणी करत मनोज जरांगे पटलांचा सरकारला थेट इशारा
कर्नाटकमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने कन्नडमध्येच बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कन्नड वगळता इतर कोणतीही भाषा बोलली जाणार नाही, अशी शपथ सर्वांनी घ्यावी. कन्नड लोक उदार असल्यामुळे आता इतर भाषा बोलून आपण कर्नाटकमध्ये राहू शकतो, असं वातावरण निर्माण झालं आहे. ही परिस्थिती तुम्हाला तमिळनाडू, आंध्रप्रदेश किंवा केरळ या राज्यात दिसणार नाही. तिथे फक्त त्यांच्या मातृभाषेत संवाद साधला जातो. त्यामुळे आपणही आपल्याच मातृभाषेत संवाद साधला पाहिजे. हीच आपल्यासाठी अभिमानाची बाब असेल असंही सिद्धरामय्या यावेळी म्हणाले.
प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा प्रज्ज्वल पाठोपाठ भाऊ सूरज रेवण्णालाही अटक; लैंगिक शोषणाच्या प्रकरणात कारवाई
कर्नाटकमध्ये कानडी वातावरण निर्माण करणं, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या सर्वांनीच कन्नडमध्ये बोललं पाहिजे. कन्नड भाषेबद्दल जिव्हाळा वाढला पाहिजे, कन्नड भाषेबरोबरच आपला देश, आपली भूमी याबद्दलही प्रत्येकाने अभिमान बाळगायला हवा, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी राज्यातील अनेक नेते उपस्थित होते.