Pahalgam Terror Attack : हाफिज सईदशी कनेक्शन अन् आधुनिक शस्त्रांचा शौकीन; मास्टरमाईंड नेमका कोण?

Kashmir Terror Attack : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला होणे हे भारताला काही नवीन नाही. मागील अनेक वर्षांपासून दहशतवाद्यांच्या हल्ल्यांवर जरब बसला होता, मात्र काल जम्मू काश्मीरच्या (Kashmir Terror Attack ) भूमीत पुन्हा दहशतवाद्यांनी थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्लाकरुन 27 जणांचा जीव घेतला. या हल्ल्यामागे लष्कर-ए-तैयबाच्या म्हणजेच ‘द रेझिस्टंट्स फ्रंट’ ने जबाबदारी स्विकारलीयं तर हल्ल्यामागचा मास्टरमाईंडचंही नाव समोर आलंय.
हिंदीच्या सक्तीबाबत राज्य सरकार एक पाऊल मागे; मोठ्या विरोधानंतर शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा!
समोर आलेल्या माहितीवर विश्वास ठेवला तर, लष्कर-ए-तैयबचा उपप्रमुख सैफुल्ला खालिद पहलगाम दहशवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. सैफुल्ला खालिदला सैफुल्लाह कसुरी म्हणूनही ओळखलं जात असून कसुरी हा भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफिज सईदचा जवळचा मानला जातोयं. खालिदला अलिशान महागड्या गाड्यांचा शौक असून तो नेहमीच नवनवीन शस्त्रांनी सुसज्ज लोकांसोबत फिरत असल्याची माहिती समोर येत आहे.
मुंबई शहरातील जमिनींवर होणाऱ्या लँड स्कॅमचा बादशाह.. आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर थेट वार
दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड सैफुल्लाह खालिदचा पाकिस्तानात चांगलाच प्रभाव असून पाकिस्तानी लष्करी अधिकारी त्याची सेवा करण्यास तत्पर असतात. पाकिस्तानी लष्कराच्या सैनिकांना तो नेहमीच चिथावणी देत असतो, असंही सांगितलं जात आहे. या हल्ल्याच्या दोन महिने आधी सैफुल्ला खालिद पाकिस्तानातील पंजाबमधील कंगनपूरला पोहोचला होता. पाकिस्तानी सैन्याची मोठी बटालियन येथे राहत आहे.
महाराष्ट्रात तापमानात रोज वाढ; राज्यातील अनेक जिल्ह्यात पाणीटंचाई, वाचा, कुठ काय स्थिती?
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानी चीफ आर्मी असीम मुनीर यांच्या भडकाऊ भाषणामुळे झाला असल्याचा दावाही केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यक्रमात असीम मुनीर यांनी हिंदू आणि मुस्लिमांबद्दल भडकाऊ भाषण केलं होतं. त्यानंतरच हा हल्ला झाला आहे. आपल्या पूर्वजांना आपण प्रत्येक बाबतीत हिंदूंपेक्षा वेगळे असून आपला धर्म वेगळा आहे. आपल्या चालीरीती, परंपरा, विचार आणि महत्त्वाकांक्षाही वेगळ्या आहेत. त्यामुळे तिथेच द्विराष्ट्रीय सिद्धांताचा पाया रचला गेला. आपण आता दोन राष्ट्रे आहोत, एक राष्ट्र नाही. आपल्या पूर्वजांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी खूप त्याग केला. त्यामुळे आपल्याला देशाचं रक्षण कसं करायचं याची माहिती असल्याचाही दावाही असीम मुनीर यांनी केला.