दिल्लीतील सातही जागांवर ‘आप’ लढणार, केजरीवालांच्या घोषणेने इंडियाला धक्का

  • Written By: Published:
दिल्लीतील सातही जागांवर ‘आप’ लढणार, केजरीवालांच्या घोषणेने इंडियाला धक्का

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) इंडिया आघाडीत (India Alliance) फूट पडू लागली आहे. बिहारमध्ये जेडीयू नेते नितीश कुमार आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली. त्यानंतर आता आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी पंजाबपाठोपाठ दिल्लीतील सातही जागांवर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

Ind Vs Aus : भारताची सुरुवातच खराब, अर्शीन तंबूत माघारी परतला 

दिल्लीत लोकसभेच्या सात जागा आहेत. केजरीवाल यांनी शनिवारी चंदीगड आणि पंजाबमध्ये आप एकटी लढणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र दिल्लीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र आज त्यांनी दिल्लीची जनता आपलाच सातही जागा देईल, असे विधान केलं. त्यामुळं दिल्लीतही ते काँग्रेससोबत लढणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. केजरीवाल यांच्या घोषणेमुळे ते दिल्लीतील सर्व जागांवर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

वागळेंच्या हल्लेखोरांवर काय कारवाई केली? संजय राऊतांचा खडा सवाल 

पंजाबमधील एका सभेत केजरीवाल बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्यपालांवरही टीका केली. आज भाजपला फक्त आम आदमी पार्टीची भीती वाटते. आम आदमी पक्षाचा देशभरात झपाट्याने विस्तार झाला आहे. आप दहा वर्षांचा लहान मुलगा आहे. या लहान मुलाने एवढा मोठा पक्ष उद्धवस्त केला. आप त्यांना झोपू देत नाही. आम्ही रात्री भुतासारखे त्यांच्या स्वप्नात येतो. यामुळं पंजाबमध्ये आम्हाला काम करण्यासापासून रोखलं जातं आहे आणि दुसरीकडे हे लोक आम्हाला दिल्लीत थांबत आहेत. मला जे काम करायचं ते काम करू दिलं जातं नाहीये, असा आरोप केजरावी यांनी केला.

राज्यपालांनी विधानसभेचे अधिवेशन होऊ दिलं नाही. दिल्लीतही परिस्थिती वेगळी नाही, पण आम आदमी पक्षाला दिल्लीच्या सातही जागा जिंकायच्या आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला लोकसभेच्या १३ पैकी १३ जागा जिंकायच्या आहेत. मग केंद्र सरकारची हिंमत होणार नाही. दिल्लीच्या सातही जागा आम आदमी पक्षाला दिल्या जातील, असं केजरीवाल म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला कडवे आव्हान देण्यासाठी दोन डझनहून अधिक विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. त्यांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली. पण, त्या आघाडीच्या एकजुटीची गाठ सुटू लागल्याचं चित्र आहे. त्या आघाडीला ममतांनी पहिला धक्का दिला. त्यांनी बंगालमध्ये एकला चलो रे घोषणा केली. नितीश यांनीही इंडियाशी फारकत घेतली. ते पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील झाले. आता केजरीवाल यांनी पंजाबमध्ये आणि दिल्लीत आम आदमी पार्टी काँग्रेससोबत हातमिळवणी करणार नसल्याचे स्पष्ट केलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज