‘श्री. अहमद…’; लोकसभेत अतीक अहमदला वाहण्यात आली श्रद्धांजली!

  • Written By: Published:
Letsupp Image   2023 07 20T130007.098

Loksabha Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. परंपरेनुसार, पहिल्या दिवशी, माजी खासदारांच्या निधनाबद्दल सर्वप्रथम सभापती ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी एकामागून एक माजी खासदारांची नावे घेतली. त्यांच्याबद्दल सांगितले आणि संसदेच्या वतीने शोक व्यक्त केला. यामध्ये सभापतींनी अतिक अहमद याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

श्रद्धांजली वाहताना ते म्हणाले, ‘अतीक अहमद हे यूपीच्या फुलपूर लोकसभा मतदारसंघातून १४व्या लोकसभेचे सदस्य होते. श्री अहमद हे रेल्वे विषयक समितीचे सदस्य होते. याआधी ते उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्यही होते. श्री अतीक अहमद यांचे 15 एप्रिल 2023 रोजी प्रयागराज येथे वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. अतीक अहमद यांना श्रद्धांजली वाहिली जाईल की नाही, अशी अटकळ पूर्वीपासून होती.

Emergency alert : Severe : तुम्हालाही असे मेसेज येत आहेत का? जाणून घ्या, काय आहे हा प्रकार

माजी खासदार अतीक यांना शिक्षा सुनावण्यात आल्याने हे वेगळे प्रकरण होते. घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप म्हणाले होते की, केवळ लोकसभा अध्यक्षांनीच यावर निर्णय घ्यायचा आहे. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना प्रयागराज येथील रुग्णालयात नेत असताना रात्री पोलीस संरक्षणात गोळ्या झाडण्यात आल्या.

Raigad Landslide : क्षणात होत्याचं नव्हतं झालं.. इर्शाळवाडीवर कोसळला दुःखाचा डोंगर

माजी खासदार अतीक अहमदवर अनेक गंभीर खटले सुरू होते. अतिकला साबरमतीला आणि अशरफला बरेली तुरुंगातून प्रयागराजला आणण्यात आले होते. त्यावेळी अतीक अहमदला पोलीस संरक्षणामध्ये गोळ्या घालण्यात आल्या. यानंतर गोळीबार करणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी हत्येमागचे कारण स्पष्ट झाले नाही. गुंडातून राजकारणी झालेला अतिक 150 हून अधिक गुन्हेगारी गुन्ह्यांमध्ये सामील होता. 2004 मध्ये तो फुलपूरमधून खासदार झाला. त्याचा संबंध समाजावादी पक्षाशी राहिला. नंतर सपाने त्यांच्याशी संबंध तोडून त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला होता.

Tags

follow us