Loksabha 2024 : ‘या’ पक्षांचे नेते भाजपात जाणार, NDA ची ताकद वाढणार; काय आहे BJP चा मास्टरप्लॅन?
Loksabha Election BJP Masterplan: पुढील वर्ष हे निवडणुकांच वर्ष आहे. 2024 मध्ये लोकसभेबरोबरच (Lok Sabha Elections) अनेक राज्यांच्या विधानसभा निवडुका होणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आता फक्त काही महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसह (BJP) सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांनी महाआघाडी स्थापन केली असतानाच आता भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचीही (NDA) ताकद वाढत आहे. सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, भाजप दर महिन्याला इतर पक्षांच्या नेत्यांना आपल्या पक्षात समाविष्ट करून घेणार आहे. (Loksabha election bjp master plan many leaders of sp and rld join NDA)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समाजवादी पार्टाच्या अखिलेश यादव यांना भाजपने मोठा झटका दिला. सपाचे नेते आणि आमदार दारा सिंह चौहान यांनी आपल्या आमदाकीचा राजीनामा देत bjp मध्ये प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेशमधील सुहेलदेव भारतीय भारतीय समाज पक्षाचे (सुभासपा)चे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर आणि लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) अध्यक्ष चे चिराग पासवान हेही आता भाजपसोबत आहेत. याशिवाय 24 जुलै रोजी सपा आणि आयएपडीचे अनेक नेते पक्षात प्रवेश करणार आहेत.
हुंड्यासाठी पत्नीचा छळ! पतीच्या अपिलावर जिल्हा सत्र न्यायालयाकडून शिक्षा कायम…
‘हे’ नेते भाजपमध्ये येऊ शकतात!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएलडी नेते राजपाल सैनी हे देखील आता BJP मध्ये प्रवेश करू शकतात. राजपाल सैनी यांच्याशिवाय, माजी मंत्री साहेब सिंह सैनी हे देखील भाजपमध्ये जाऊ शकतात. तसेच समाजवादी पार्टीचे नेते जगदीश सोनकर, सपा नेत्या सुषमा पटेल, गुलाब सरोज आणि माजी आमदार अंशुल वर्मा हे देखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.
एनडीएची ताकद वाढतेय
भाजपचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोध विरोधकांची एकजूट करत आहेत. पण, भाजपकडूनही लोकसभा जिंकण्यााठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. दोन दिवसांपूर्वी 18 जुलै रोजी दिल्लीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या मित्रपक्षांची बैठक झाली, त्यात सत्ताधारी पक्षाने आपली ताकद दाखवली. या बैठकीत देशभरातील तब्बल 38 पक्ष सहभागी झाले होते. या बैठकीपूर्वी ओम प्रकाश राजभर आणि चिराग पासवान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
विरोधी पक्षांची महाआघाडी
एकीकडे एनडीएमधील पक्षांची संख्या वाढत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांनीही महाआघाडी स्थापन केली आहे. या आघाडीला ‘इंडिया’ असे नाव देण्यात आले आहे. त्यात आतापर्यंत 26 पक्ष सहभागी झाले आहेत.