‘मोहन’सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत आमदार कश्यपांची वर्णी…

‘मोहन’सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत आमदार कश्यपांची वर्णी…

Mla Chaitanya kashyap : मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदार चैतन्य कश्यप (Mla Chaitanya kashyap) यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांनी आज शपथ घेतली. कश्यप हे रतलाम विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत. मध्य प्रदेशातील टॉप-10 श्रीमंत आमदारांमध्ये चैतन्य कश्यप पहिल्या क्रमांकावर आहे. ते 294 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. कश्यप यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…

Manoj Jarange : …तर मराठ्यांवर अन्यायच! हरिभाऊ राठोडांचा फॉर्म्युला जरांगेंनी फेटाळला

मध्य प्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यावेळी मंत्रिमंडळात 18 मंत्री, 6 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 4 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. सर्वात श्रीमंत आमदार चैतन्य कश्यप यांनाही मोहन यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या 2023 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, चैतन्य कश्यप यांच्याकडे 294 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.

काळजीच करु नका, शिरुरमध्ये पर्याय देणार अन् निवडूनही आणणार : अजितदादांचा कोल्हेंविरोधात शड्डू

मध्य प्रदेशातील भाजपचे सर्वात श्रीमंत आमदार चैतन्य कश्यप 16 व्या विधानसभेत रतलाम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. कश्यप यांनी पगार आणि भत्ते न घेण्याचे जाहीर केले आहे. चैतन्य यांनीही विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहाला याबाबत माहिती दिली होती. आता चैतन्य कश्यप यांना मोहन सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे.

Brijbhushan Sharan Singh यांनी साक्षीचे आरोप फेटाळले; संजय सिंह निकटवर्तीय नसल्याचा दावा

दरम्यान, मंत्री चैतन्य कश्यप 294 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक असून कश्यपचे वार्षिक उत्पन्न 37 लाख रुपये आहे. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही करोडोंच्या संपत्तीचे मालक आहेत. चैतन्य कश्यप यांची धार जिल्ह्यातील बदनावार येथे कश्यप स्वीटनर्स आणि कश्यप विद्यापीठ या नावाने शाळा असून महाराष्ट्रात त्यांचे दोन कारखाने आहेत. चैतन्य कश्यप यांना दोन मुले असून दोघेही मुंबईत राहतात.

Nitesh Rane : ‘सुधाकर बडगुजर सिर्फ झांकी है, संजय राऊत अभी’..; नितेश राणेंचं चॅलेंज काय?

रविवारी (3 डिसेंबर) रोजी देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले. यात तीन राज्यात भाजपने विजयाचा झेंडा फडकावला. या हिंदी पट्ट्यातील राज्यात मोदींची जादू चालली. भाजपने मध्य प्रदेश तर राखलेच शिवाय छत्तीसगड आणि राजस्थानातून काँग्रेसला सत्तेतून बेदखल केले. मध्य प्रदेशमध्ये भाजपने 230 पैकी 163 जागा जिंकत दोन तृतीयांश बहुमत प्राप्त केले. तर काँग्रेसला केवळ 66 जागा जिंकण्यात यश आले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube