महाराष्ट्र सरकारने राज्यातील तीन प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी 100 टक्के टोलमाफी लागू केली आहे. हा निर्णय मोटार व्हेइकल अॅक्ट 1958 अंतर्गत घेण्यात आला असून, 22 ऑगस्ट 2025 पासून तो प्रभावी झाला आहे.
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या विकासासाठी चांगले वातावरण तयार करणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे.
राज्यात 2026-27 या वर्षासाठी 15 हजार शेतकरी उत्पादक गट तयार करून शेतकऱ्यांना सहभागी करून घेण्याचे उद्दिष्ट आहे
अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मोठे भाष्य केले आहे. “काही निवडणुका कदाचित जानेवारी महिन्यात होतील. मला ठोस माहिती नाही पण जानेवारी महिन्यात नवीन बॉडी येण्याची शक्यता आहे". असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आता या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
छगन भुजबळ यांची नाराजी आम्ही नक्कीच दूर करू, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
ओबीसी समाजाने मराठा आरक्षणाला तीव्र विरोध दर्शवत नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरू केले होते. मात्र मंत्री अतुल सावे यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे उपोषण स्तगित करण्यात आलं आहे.