… तर येत्या निवडणुकीत धुरळा उडवू; आरक्षणावर जरांगे पाटील पुन्हा आक्रमक भूमिकेत

Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत होते. या आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढला आहे. दुसरीकडे या जीआरनंतर अनेक ओबीसी नेते नाराज झाले असून ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्याचा इशारा देत आहे.
तर दुसरीकडे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मराठा आंदोलन संपलेले नाही आणि ते कोणी संपवू शकत नाही असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे- पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांच्यावर विश्वास असून सरकारने दिलेल्या शब्दानुसार महिनाभरात सातारा गॅझेट (Satara Gazette) लागू करावे अन्यथा येत्या निवडणुकांत सरकारचा धुरळा उडवू आणि राज्यभरात एकाही नेत्याला रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशारा माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणात सर्व मराठ्यांना घालणारच मी मराठ्यांचा नोकर आहे आणि समाजासाठी काम करतो आहे. असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच मराठा आंदोलन संपलेले नाही आणि ते कोणी संपवू शकत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यावर विश्वास असून सरकारने दिलेल्या शब्दानुसार महिनाभरात सातारा गॅझेट लागू करावे अन्यथा येत्या निवडणुकांत सरकारचा धुरळा उडवू आणि राज्यभरात एकाही नेत्याला रस्त्यावर फिरु देणार नाही असं माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले.
पाच दिवस आंदोलन
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला सुरुवात केली होती. पाच दिवस चालणाऱ्या या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबात जीआर काढला आहे. तसेच महिनाभरात सातारा गॅझेट लागू करणार असा शब्द जरांगे पाटील यांना दिला आहे.