मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आपल्या सोशल मीडियावर करत असलेल्या सततच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. पण याच फोटोमुळे ती वादात सापडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली होती. उर्फी जावेदनं यानंतर सोशल मीडियावर पोस्ट करत चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं होतं. भाजपच्या महिला आघाडीनं उर्फी जावेद […]
धाराशिव : धाराशिवमधील परंडा तालुका म्हणजे कमी पावसाचा भाग. अशातच अर्थिक परिस्थिती जेमतेम तरीही संघर्षमय परिस्थितीतून पुढे येत शेतकऱ्याचा मुलगा उपजिल्हाधिकारी पदी विराजमान झाला आहे. शेतकऱ्याच्या मुलाला मिळालेल्या यशाबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पत्राद्वारे कौतुक केलंय. सावंत पत्रात म्हंटले, धाराशिवमधील परंडा तालुक्यातील लाकीबुकी येथील भास्करराव गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून सालगडी म्हणून कार्यरत आहेत. […]
अहमदनगर : जिल्ह्यातील कोविड उपाय योजनांची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांनी आज जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच कोविड उपाय योजनांची पाहणी केली. केंद्रीय यंत्रणेने कोविडची लाट पुन्हा येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. केंद्र सरकारने १९ कोटी रुपये जिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य सुविधेसाठी […]
अहमदनगर : शहराचे नाव अहिल्यादेवी नगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत केली होती. यावर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपले मत आज प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केले. जिल्ह्या बाहेरील व्यक्तीने नामांतराची मागणी करणे संयुक्तिक नाही, असे त्यांनी सांगितले. खासदार विखे म्हणाले, अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदलावे ही मागणी कुठेही […]
मुंबई : अपुऱ्या सुविधा व थकलेल्या वेतनासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटनेचा संप सुरू असून, याद्वारे संपावर गेलेल्या 7 हजारहून अधिक डॉक्टरांच्या मदतीला माजी मंत्री धनंजय मुंडे हे धावून आले आहेत. या डॉक्टर्सचे थकीत पगार, निर्वाह भत्ते, पदनिर्मिती, शासकीय वसतिगृहातील स्वच्छता व अन्य सुविधा, समान वेतन, प्राध्यापकांची भरती यांसह विविध न्याय्य मागण्या तातडीने […]
ठाणे : छत्रपती शिवरायांबद्दलच्या वादग्रस्त लिखाणाबाबत जेम्स लेन यांनी जे लिहिलंय त्यावर कोणी काहीच बोलत नाहीत, तसेच सावरकरांच्या सहा सोनेरी पानं आणि गोवलकरांच्या विचारधन पुस्तकात संभाजीराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केलंय, त्याबद्दल माझ्याशी बोलण्याची कोणाची हिम्मत आहे का? असं खुलं चॅलेंज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांनी छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या […]