बीड : जिल्ह्यातील काका पुतण्याच्या लढतीत पुन्हा पुतण्यानं बाजी मारल्याचं पाहायला मिळतंय. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील राजकीय वादानंतर बीड तालुक्यातील नवगण राजुरीकरांनी संदीप क्षीरसागर यांच्याच गटाला झुकतं माप दिलंय. ग्रामपंचायत निवडणूक निकालात आज संदीप क्षीरसागर गटाच्या सरपंचपदासह सर्व सदस्यांनी एकतर्फी विजय मिळविलाय. जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी अधिराज्य असलेल्या दिवंगत लोकनेत्या […]
अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ आमदार बबनराव पाचपुते यांना पराभवाचा धक्का बसलाय. त्यांचे पूत्र प्रतापसिंह यांचा पुतणे साजन पाचपुते यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव केलाय. त्यामुळे पाचपुते यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. बबनराव पाचपुते यांच्या राजकीय वाटचालीतील चाणक्य म्हणून त्यांचे भाऊ सदाशिव पाचपुते ओळखले जात होते. दोन वर्षांपूर्वी सदाशिव पाचपुते […]
जळगाव : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील ऊर्फ चंद्रकांत पाटील यांची गड आला पण सिंह गेला, अशीच अवस्था झाली आहे. कारण त्यांची कन्या भाविनी पाटील या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचाय सदस्य म्हणून विजयी झाल्या मात्र, त्यांचे संपूर्ण पॅनेल पराभूत झाले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांचा हा तालुका आहे. त्यामुळे संपूर्ण […]
अहमदनगर : आज झालेल्या ग्रामपंचायत मतमोजणीत आमदार शंकरराव गडाख गटाचे वर्चस्व पाहण्यास मिळाले. कांगोणी, भेंडे खुर्द व वडाळ्यात सत्तांतर झाले आहे. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे गटाच्या ताब्यात असलेल्या कांगोणीत गडाख गटाचा सरपंच निवडून आला आहे. येथे ११ पैकी ८ सदस्य मुरकुटे गटाचे निवडून आले आहेत. तर भेंडा येथे घुले + […]
सांगली : आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडीत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची एकतर्फी सत्ता आली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री विजय झाल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या सातही जागांवर पडळकर समर्थक सदस्य विजयी झाले आहेत. तर सरपंचपदी गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर या ३०० मतांनी निवडून आल्या आहेत. जिल्ह्यातील ४१६ ग्रामपंचायत निवडणुकीसाठीची मतमोजणी सध्या सुरू आहे. आत्तापर्यंत […]
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या तुंगत ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसच्या प्रकाश पाटलांनी भाजपच्या प्रशांत परिचारकांना जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसच्या प्रकाश पाटलांच्या गटाने या ठिकाणी सरपंचपदासह 13 जागांवर दणदणीत विजय मिळवला. पंढरपूर तालुका ग्रामपंचायत निवडणुक निकालांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पंढरपूर तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडीची सत्ता आली तर तुंगतमध्ये कॉंग्रेसचे नेते […]