युनिफाइडचा यू म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न; नव्या पेन्शन योजनेवरून कॉंग्रेसची बोचरी टीका

मोदी सरकारने नव्या पेन्शन योजनेचं नाव युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) असं ठेवलं आहे. यातील युनिफाइडचा यू हा मोदी सरकारचा यू टर्न

PM मोदी पुण्यातून फुंकणार विधानसभेसाठी रणशिंग, करणार मेट्रो मार्गाचे उद्घाटन

Mallikarjun Kharge On Unified Pension Scheme : जुनी पेन्शन योजना ( Unified Pension Scheme) लागू करावी, अशी मागणी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांकडून लावून धरण्यात येत होती. मात्र, काल केंद्र सरकारने (Central Govt) मागणीला बदल देत नवी पेन्शन योजनेला मंजुरी दिली आहे. युनिफाइड पेन्शन स्क्रीम असे नाव या योजनेचं नाव आहे. याच योजनेवरून विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहे. आता कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मोदी सरकारवर (Modi Govt) टीका केली.

Pune Accident : एसटी बस अन् कारचा भीषण अपघात, महिलेचा दुर्दैवी मृत्यू, 6 जण गंभीर जखमी 

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, मोदी सरकारने नव्या पेन्शन योजनेचं नाव युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) असं ठेवलं आहे. यातील युनिफाइडचा यू हा मोदी सरकारचा यू टर्न आहे. 4 जूननंतर जनतेची शक्ती पंतप्रधान मोदींच्यचा अहंकारावर हावी होत आहे, अशी खोचक टीका खर्गेंनी केली.

कुत्र्यासोबत घाणेरडे कृत्य करताना पकडला विकृत माणूस; व्हिडिओ व्हायरल होताच अटक 

खर्गेंनी पुढं लिहिलं की, 4 जूननंतर मोदी सरकारने आतापर्यंत चार निर्णय मागे घेतले आहेत. सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेला दीर्घकालीन भांडवली नफा/इंडेक्सेशनच्या संदर्भातील निर्णय देखील मागे घेतला आहे. तसेच वक्फ विधेयक जेपीसीकडे पाठवले आहे. याशिवाय, ब्रॉडकास्ट बिल आणि लॅटरल एंट्री योजनेतही सरकारने माघार घेतली आहे, असंही खर्गे म्हणाले. तसेच आम्ही सरकारचे उत्तरदायित्व सुनिश्चित करत राहू आणि या देशातील 140 कोटी भारतीयांचे संरक्षण करत राहू, असं खर्गे म्हणाले.

काय आहे योजना?
या नवीन योजनेद्वारे, जर एखाद्या कर्मचाऱ्याने किमान 25 वर्षे काम केले असेल, तर निवृत्तीपूर्वी नोकरीच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराच्या किमान 50 टक्के रक्कम पेन्शन म्हणून दिली जाईल.

जर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला कर्मचाऱ्याच्या मृत्यूपर्यंत मिळालेल्या पेन्शनपैकी 60 टक्के रक्कम मिळेल. 10 वर्षांनंतर कोणी नोकरी सोडल्यास त्याला 10,000 रुपये पेन्शन मिळेल. युनिफाइड पेन्शन योजनेचा सुमारे 23 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. ही नवीन योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार आहे.

follow us