…पण आपण मनापासून प्रयत्न करत नाही; काँग्रेस अधिवेशनात राहुल-सोनियांच्या समक्ष पक्षाध्यक्ष खरगेंनी

Mallikarjun Kharge on Congress Activist in Congress session Gujrat : गुजरातमधील अहमदाबादमध्ये काँग्रेसचं अधिवेशन (Congress) पार पडलं. गुजरातमध्ये तब्बल 64 वर्षांनी आज पुन्हा एकदा काँग्रेसचं अधिवेशन पार पडलंय. या अधिवेशनाला काँग्रेसच्या सर्व दिग्गज नेत्यांनी हजेरी लावत आपली ताकद दाखवून दिलीयं. अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कार्यकर्त्यांचे कानल टोचले.
काय म्हणाले मल्लिकार्जुन खरगे?
कोणत्याही संस्थेला पुढे जायचं असेल तर तीन गोष्टींची आवश्यकता असते. ज्यामध्ये विचार, आचार आणि प्रचार असायला हवे. कॉंग्रेसकडे विचार आहे मात्र त्याला आचरणात आणण्याचा प्रयत्न मनापासून आपण करत नाही. तसेच त्या विचारांचा प्रचार झाला नाही तर काय फायदा? राहुल गांधींनी कश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भारत जोडो यात्रा काढली. मात्र त्या विचारांना पुढे नेलं जाणार नसेल तर ती विचारधारा अयशस्वी ठरते. तसेच यावेळी वक्फ कायद्यावर देखील बोलले ते म्हणाले की, कॉंग्रेस नेहमी अल्पसंख्यांकांसाठी उभा आहे. आम्ही तुमच्यासाठी लढत आहोत.
कोकणी माणसावर ‘उबाठा’ चे बेगडी प्रेम, दीपक केसरकरांचा हल्लाबोल
तर यावेळी राहुल गांधी यांनी यांनी पुन्हा एकदा जातिनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदींसह आरएसएसला टार्गेट केल्याचं दिसून आलंय. ते म्हणाले की, देशात दलित, अतिमागास, आदिवासी, अल्पसंख्य किती आहेत, त्यांचा विकास किती झालायं, याबाबत जाणून घेण्यासाठी आम्ही जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने भूमिका मांडलीयं. आम्हाला जातनिहाय जनगणना करायची नाही, आम्हाला याबाबत जाणून घ्यायचं नाही, या शब्दांत मोदी आणि आरएसएसने विरोध केला असल्याचं राहुल गांधी यांनी स्पष्ट केलंय.
भारताची ताकद वाढणार! नौदलासाठी फ्रान्सकडून 26 राफेल विमाने खरेदी करणार, 63 हजार कोटींची डील
तसेच आम्ही तेलंगणामधून जातनिहाय जनगणनेसाठी एक पाऊल पुढं टाकलंय. तेलंगणामध्ये 90 टक्के आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक आहेत. देशातील सहकार खात्यातून या समुदायाला काय मिळालंय, तेलंगणाच्या या बांधवांना काहीच मिळालेलं नाही. मालकांच्या यादीत एकही दलित आदिवासी तुम्हाला पाहायला मि्ळणार नाही. आम्हाला त्यांचा हक्क द्यायचा आहे, याची सुरुवात आम्ही तेलंगणा राज्यातून करत असल्याचं राहुल गांधी यांनी यावेळी नमूद केलंय.
जनगणनेचा कायदा आम्ही राज्यसभा लोकसभेत मंजूर करु…
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने सांगितलंय की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही. आम्हाला याबाबत माहिती करुन घ्यायची नाही.. देशातील गरीब, दलित आदिवासी अल्पसंख्यांच्या भागीदारीबाबत आम्हाला माहित करुन घ्यायचं नाही. भाजपला काय लपवायचं ते लपवू द्या पण आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत कायदा मंजूर करुनच घेणार असल्याचं राहुल गांधींनी ठणकावून सांगितलंय.