Who is Purnesh Modi : राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण ?

Who is Purnesh Modi : राहुल गांधींची खासदारकी घालवणारे पूर्णेश मोदी कोण ?

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द झाली. मोदी आडनावाचा अपमान केल्याच्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी दोषी ठरले होते. सुरत सत्र न्यायालयाने त्यांना २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आज लोकसभेच्या सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली. गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी (Purnesh Modi) यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला. यामुळे राहुल गांधी यांना शिक्षा तर झालीच पण खासदारकीही गमवावी लागली आहे. ज्यांच्यामुळे राहुल गांधींना संसदेतूनच बाद व्हावं लागलं ते पूर्णेश मोदी कोण आहेत? चला तर मग पूर्णेश मोदी कोण आहेत पाहुयात.

पूर्णेश मोदी हे सूरत जिल्ह्यातील सूरत पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. पूर्णेश मोदी यांचा जन्म 1965 मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ईश्वरलाल मोदी. मोदी हे प्रोफेशनल ग्रॅज्युएट आहेत. बी. कॉम 1992 मध्ये, त्यांनी सर चौवशी लॉ कॉलेज, सूरत येथून एलएलबी पदवी प्राप्त केली. भाजप नेत्याच्या संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ते 1.73 कोटी रुपयांचे मालक आहेत. त्यांच्या नावावर 35 लाखांहून अधिक कर्ज आहे. सध्या वकिली हा त्यांचा व्यवसाय आहे.

Rahul Gandhi : खरं बोलण्याची किंमत राहुल गांधींना चुकवावी लागली; काँगेसचा हल्लाबोल

पूर्णेश मोदीचा राजकीय प्रवास
2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत पूर्णेश मोदींनी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या सुरतच्या पश्चिम जागा जिंकल्या. मोदी काँग्रेसचे उमेदवार संजय आर. शाह यांचा 1,04,312 मतांनी पराभव झाला. भूपेंद्र पटेल यांच्या सरकारमध्ये सप्टेंबर 2021 मध्ये पूर्णेश मोदी यांना रस्ते आणि बांधकाम मंत्री करण्यात आले होते. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर, सूरत हे एकमेव शहर होते, ज्यामध्ये तत्कालीन भूपेंद्र पटेल सरकारमध्ये ४ मंत्री होते. चौघांपैकी एक कॅबिनेट मंत्री तर इतर राज्यमंत्री होते.

मात्र, मंत्रालयाच्या कामकाजाबाबत तक्रारी आल्यानंतर 11 महिन्यांतच पूर्णेश मोदींचे मंत्रीपद काढून घेण्यात आले. पूर्णेश मोदी 2009-12 आणि 2013-16 मध्ये सुरत शहरात भाजपचे अध्यक्षही राहिले आहेत. मोदी हा या भागातील ओबीसी समाजाचा मोठा चेहरा मानला जातो.

अध्यादेश टराटरा फाडला, मनमोहन सिंगाचा अपमान केला; राहुल गांधींना अहंकार नडला

2017 मध्ये भाजपला विजय मिळाला

2017 च्या विधानसभा निवडणुकीतही भाजपने ही जागा जिंकली होती. या निवडणुकीत मोदींनी काँग्रेसच्या इक्बाल पटेल यांचा ७७ हजार मतांनी पराभव केला.

2013 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते.

2017 च्या आधी, 2013 च्या पोटनिवडणुकीतही मोदींनी भाजपला ही जागा जिंकण्यासाठी मदत केली होती, जो त्यांचा पहिला विजय होता. भाजप आमदार किशोर भाई व्यंकवाला यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक झाली होती.

राहुल गांधींकडे दोनच पर्याय; नाही तर तुरुंगात मुक्काम

सामाजिक संस्थांशीही जोडले

राजकारणाव्यतिरिक्त मोदी अनेक सामाजिक संस्थांशी निगडीत असून समाजासाठी काम करतात. भाजप नेते सध्या स्वातंत्र्य वीर सावरकर स्मूदी समिती आणि भारत सेवाश्रम संघ- हिंदू मिलन मंदिराचे प्रमुख म्हणून काम करत आहेत. शिवाय पब्लिक एज्युकेशन ट्रस्ट आणि आर्य समाजाच्या कार्यकारी समितीचे सदस्यत्व त्यांच्याकडे आहे. याआधी मोदींनी सुरत शहर गणेश आणि उत्सव समितीचे अध्यक्ष आणि सरचिटणीस, वीरता ग्रुपचे अध्यक्ष, श्री सुरती मोध वनिक (घांची) सर्व पंचचे विश्वस्त अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.

मोठी बातमी; राहुल गांधींची खासदारकी रद्द; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया…

चर्चेत कधी आले ? 

2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकातील कोलार येथील सभेत राहुल गांधी म्हणाले होते की, सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे आहे ? याबाबत पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल यांनी आपल्या वक्तव्याने संपूर्ण मोदी समाजाची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधीविरुद्ध आयपीसी कलम ४९९ आणि ५०० (मानहानी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरतच्या कोर्टाने राहुल गांधींवर मोदी आडनावावरून शिक्षा सुनावली आहे. या निर्णयावर पूर्णेश मोदी म्हणाले, ‘कोणत्याही नेत्याने कोणत्याही समाजासाठी वक्तव्य करू नये. राहुल गांधींनी दोन-पाच लोकांना टार्गेट करण्याऐवजी आमच्या संपूर्ण समाजाला टार्गेट केलं. त्यामुळेच आम्ही गुन्हा दाखल केला होता. ते पुढे म्हणाले, ‘आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये नक्कीच आहोत, पण ही राजकीय बाब नाही. सामाजिक प्रश्नामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. यात कोणताही राजकीय फायदा नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube