Badruddin Ajmal : ‘मी साडी नेसेन आणि पाच वर्षे मांस खाणार नाही’; अजमल यांचा UCC ला विरोध

Badruddin Ajmal : ‘मी साडी नेसेन आणि पाच वर्षे मांस खाणार नाही’; अजमल यांचा UCC ला विरोध

MP Badruddin Ajmal on UCC : देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी केंद्र सरकारने (Central Govt) वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी (२७ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी समान नागरी कायद्याचे (Uniform Civil Law) जोरदार समर्थन केल्यानंतर आता समान नागरी कायदा लागू करण्याच्या निर्णयाला अनेक राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. तर काहींनी विरोध देखील केला. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (AIUDF) चे अध्यक्ष आणि खासदार बदरुद्दीन अजमल (MP Badruddin Ajmal) यांनीही समान नागरी कायद्याला विरोध केला आहे. (MP Badruddin Ajmal on UCC i will wear a saree and not eat meat for five years)

गुरुवारी धुबरी येथील एका सभेत बोलतांना बदरुद्दीन अजमल यांनी यूसीसीवरआक्षेप घेतला. अजमल म्हणाले की, मोदी सरकार समान नागरी संहिता लागू करण्यासाठी संसदेत ठराव मंजूर करून घेत आहे, मात्र आम्ही या कायद्याचा विरोध करतो. जर समान नागरी कायदा लागू झाला तर मी पाच वर्ष साडी नसेल, दाढी वाढवेल आणि मांस खाणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं. दरम्यान, अजमल यांनी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या आसामध्ये बहुपत्नीत्वार बंदी घालण्याच्या मुद्द्याचे समर्थन केले.

अधर्म नाही ही तर कुटनीती; सध्याच्या राजकारणावर फडणवीसांनी दिलं महाभारतातील कर्णाचं उदाहरण 

अजमल म्हणाले, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून सरकारनं पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करू नाही, हा भाजपचा अजेंडा असून समान नागरी कायदा लागू झाल्यास पर्सनल लॉ अस्तित्व संपू शकतं. जर UCC लागू केले तर मुस्लिमांच्या जीवनशैलीतील बऱ्याच गोष्टी सरकार ठरवेल. आमचा या कायद्याला विरोध असून जर समान नागरी संहिता लागू झाल्यावर आम्ही सर्वजण साड्या घालू. कधी कधी दाढी ठेवू, कधी नाही. काय सरकार हे पटेल का? असा सवाल त्यांनी केला.

UCC एक जुमला आहे: अजमल
काल त्यांनी यूसीसीला जुमला असे संबोधले. “कलम 370 रद्द केल्याने काश्मीरमध्ये काय बदल झाले आहेत? उलट परिस्थिती बिघडली आहे. पंतप्रधान मोदी आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या मते तिहेरी तलाक ही मुस्लिमांची सर्वात मोठी समस्या होती. मात्र, ही मुस्लिमांची खरी समस्या नाही. त्यांना केवळ मुस्लिमांना त्रास देणे आवडते, अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube