Mukhtar Ansari : मु्ख्तार अन्सारीचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टमच्या अहवालातून मिळालं उत्तर

Mukhtar Ansari : मु्ख्तार अन्सारीचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टमच्या अहवालातून मिळालं उत्तर

Mukhtar Ansari Death Reason : कुख्यात गँगस्टर मु्ख्तार अन्सारी याचा गुरुवारी (Mukhtar Ansari Death) उत्तर प्रदेशातील बांदा कारागृहात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडाली होती. अन्सारीच्या मृत्यूवर विविध शंका उपस्थित केल्या जात होत्या. आता या चर्चा आणि शंकांना पूर्णविराम मिळाला आहे. अन्सारीचा पोस्टमार्टेम अहवाल मिळाला असून त्याचा मृत्यू कशामुळे झाला याची माहिती समोर आली आहे.

राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजच्या पॅनलने मुख्तार अन्सारीच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केले. हॉर्ट अॅटॅकमुळेच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्सारीच्या पोस्ट मार्टेम अहवालातून देखील त्याच्या मृत्यूचं कारण हार्ट अटॅक (मायोकार्डिअल इन्फार्क्शन) असल्याचे समोर आले आहे. मुख्तार अन्सारीच्या कुटुंबाने जो स्लो पॉइझनिंगचा दावा केला होता तो डॉक्टरांनी स्पष्टपणे नाकारला आहे.

Mukhtar Aansari died : कुख्यात गॅंगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू; जेलमध्येच आला ह्रदयविकाराचा झटका

पोस्टमार्टेम दरम्यान पूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले. यानंतर व्हिसेरा सुरक्षित ठेवण्यात आला आहे. हा व्हिसेरा फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. जेणेकरून तपासणी होऊ शकेल की खरेच काही विषारी पदार्थ दिले गेले होते का, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पोस्टमार्टेमनंतर शुक्रवारी संध्याकाळी मुख्तार अन्सारीचा मृतदेह गाझीपूर येथे पाठवण्यात आला.

दरम्यान, मुख्तार अन्सारीच्या मृत्यूवर विरोधी पक्षांनीही प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे या प्रकाराची मॅजिस्ट्रेट चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. बांदा तुरुंगात मुख्तार अन्सारीला स्लो पॉइझन देण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश बांदा मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान दास गुप्ता यांनी जारी केले होते. त्यांनी दिलेल्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गरिमा सिंह यांची तपासी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Mukhtar Ansari : कुख्यात माफिया जो, सिस्टीमशी खेळता खेळताच संपला..

अन्सारी हा सध्या उत्तर प्रदेशातील बांदा जेलमध्ये शिक्षा भोगत होता. त्याच्या मृत्यूने गुन्हेगारी जगातील प्रकरण संपुष्टात आलं आहे. तर राजकीय वर्तुळात देखील तो तेवढाच सक्रीय होता. वेग-वेगळ्या पक्षांच्या तिकीटांवर निवडणूक लढवत तो तब्बल पाच वेळा आमदार राहिला आहे. तीन निवडणुका तर त्याने जेलमध्ये असताना देखील तो निवडून आला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube