“भाजपला मोठ्या मार्जिनने विजयी करा”; समाजवादी पार्टीच्या नेत्याची भरसभेत फजिती

“भाजपला मोठ्या मार्जिनने विजयी करा”; समाजवादी पार्टीच्या नेत्याची भरसभेत फजिती

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे नेते शिवपाल यादव यांचा एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मैनपुरी लोकसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यानचा आहे. प्रचारसभेदरम्यान त्यांच्या तोंडून असे वाक्य निघाले ज्यामुळे सगळेच आवाक् झाले. समाजवादी पार्टीच्या उमेदवार डिंपल यादव यांच्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेत शिवपाल यादव भाजपला विजयी करण्याचे आवाहन करून बसले. आता इतका मोठा नेता असे वक्तव्य करतो म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

मैनपुरी लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव मैदानात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचारसभेत अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी जोरदार भाषण केले. याच भाषणात त्यांनी सरळसरळ कट्टर विरोधी भाजपलाच विजयी करण्याचे आवाहन लोकांना केले. ते म्हणाले, 7 मे रोजी यंदा भाजपला मोठ्या मताधिक्याने विजयी करायचे आहे. तसं पाहिलं तर त्यांनी हे वक्तव्य समाजवादी पार्टीच्या बाजून करायला पाहिजे होतं. पण घडलं भलतंच.

आता त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विरोधी पक्षांचे नेते, सोशल मीडिया युजर्स त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत आहेत. याआधी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री सतीश चंद्र शर्मा यांनी प्रचार सभेत असेच वक्तव्य केले होते. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रचाराच्या काळात नेत्यांच्या तोंडून असे वाक्य बऱ्याचदा ऐकायला मिळतात. नंतर डॅमेज कंट्रोल करताना या नेते मंडळींना मोठी कसरत करावी लागते.

Lok Sabha 2024 : काँग्रेसचा मोठा डाव! लडाखमधून भाजपविरोधात तगडा उमेदवार

follow us
  • fb
  • instagram
  • youtube