Narendra Modi : सनातन धर्माच्या समर्थनात आता भाजप मैदानात उतरली आहे. सनातन धर्माच्या वादात विरोधकांना ताकदीने युक्तिवाद करुनच प्रत्युत्तर द्यावं, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या नेत्यांना दिला आहे. नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा सनातन धर्माच्या वादावर जोरदार प्रत्युत्तर द्यावं, असं मोदींनी सांगितलं आहे. […]
मुलीच्या प्रेमविवाहामुळे नाखूष असलेल्या एका दलित कुटुंबाने विष प्राशन करुन सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. गुजरातच्या अहमदाबाद जिल्ह्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेत वडील आणि एका मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि एक मुलगा बचावला आहे. किरण राठोड (52) आणि हर्ष (24) अशी मृतांची नाव आहेत. तर पत्नी नीताबेन (50) आणि दुसरा […]
INDIA Alliance : केंद्रातील भाजप सरकारला सत्तेतून बेदखल करण्यासाठी देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी (INDIA Alliance) स्थापन केली. या आघाडीच्या तीन बैठका झाल्या. आघाडी अभेद्यच आहे आणि पूर्ण ताकदीने भाजपला (BJP) टक्कर देणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, या विरोधकांची आघाडी किती तकलादू आहे हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी […]
One Nation, One Election : केंद्रातील मोदी सरकार ‘वन नेशन, वन इलेक्शन’ (One Nation, One Election) विधेयक लागू करण्याच्या तयारीत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून गेल्या काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू असून आता या हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकारने ‘वन नेशन, वन इलेक्शन’साठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन केली […]
India Vs Bharat : भारतासाठी (Bharat) वापरण्यात येणारा ‘इंडिया’ (INDIA) हा शब्द (President of Bharat) हटविण्याच्या हालचाली मोदी सरकारकडून सुरू असल्याच्या चर्चा आहेत. संसदेच्या विशेष अधिवेशनात याबाबत विधेयक आणले जाईल अशीही शक्यता आहे. सरकारच्या या हालचालींमुळे देशात ‘इंडिया’ विरुद्ध ‘भारत’ असा नवा वाद सुरू झाला आहे. अशातच आता आणखी एक बातमी आली आहे. इंडिया नाव […]
ITC लिमिटेड या नामांकित कंपनीला ग्राहक न्यायालयाने दणका दिला आहे. मारी बिस्किटच्या पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी दिल्याने नुकसान भरपाई म्हणून एका ग्राहकाला 1 लाख रुपये देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. प्रत्येक पॅकेटमध्ये एक बिस्किट कमी देऊन कंपनी आपल्या ग्राहकांची दररोज 30 लाख रुपयांची फसवणूक करते असा आरोप चेन्नईस्थित तक्रारदार पी. दिल्लीबाबू यांनी आरोप केला होता. […]