Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पंजाब सरकारने एका एसपी, दोन डीएसपींसह 7 जणांना निलंबित केले आहे. 5 जानेवारी 2022 रोजी पंतप्रधान फिरोजपूर (Ferozepur rally) येथे आयोजित सभेत सहभागी होण्यासाठी जात असताना शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरने रस्ता अडवला होता. यामुळे पंतप्रधानांचा ताफा काही वेळ थांबला होता. आता या प्रकरणी फिरोजपूरचे तत्कालीन […]
नवी दिल्ली : आजकाल काही कुटुंबांमध्ये परदेशात जाऊन लग्न करणायेच वातावरण तयार होत आहे. हे आवश्यक आहे का? जर आपण भारतीय भूमीवर, भारतीयांसोबत, इथल्या लोकांमध्ये विवाह साजरे केले, तर देशाचा पैसा देशातच राहील, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी परदेशात लग्न करण्याच्या वाढत्या पद्धतीवर भाष्य केले. पंतप्रधान मोदी यांनी आज (26 नोव्हेंबर) ‘मन […]
Mann ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात (Mann ki Baat) या कार्यक्रमात देशवासियांना खास आवाहन केलं. नागरिकांनी आता देशात तयार केलेल्या वस्तू जास्तीत जास्त वापराव्यात. ऑनलाइन पद्धतीनेच व्यवहारांना प्राधान्य द्यावे. परदेशात लग्न सोहळे आयोजित करण्याऐवजी देशातच करा. यामुळे देशातील गरीब लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. त्यांची मदत होईल आणि […]
Uttarakhand Tunnel Rescue : उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशीतील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Tunnel Rescue) मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे. मजुरांना बाहेर काढण्यास विलंब होत आहे. त्यात आता वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या सुटकेसाठी आणखी एक महिन्याचा […]
Mahadev Betting App : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्यावर महादेव बेटिंग अॅप (Mahadev Betting App) प्रकरणात 508 कोटी रुपये घेतल्याचा आरोप ईडीने केला होता होता. मात्र आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या कुरिअर बॉयने ईडीवरच आरोप केले आहेत. आपण कधीही कोणत्याही राजकारण्याला रोख रक्कम दिली नाही. ईडीचे […]
Rajasthan Election 2023 Voting : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी (Rajasthan Assembly Elections) आज मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी 200 पैकी 199 मतदारसंघात मतदान झाले. गेल्या काही दशकांत परंपरेने हरएक विधानसभा निवडणुकीत राज्यातील सरकार बदलत आले. मात्र, राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी यावेळी राजस्थानमध्ये कल बदलेल आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, […]