Manipur Violence : देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूर मागील सहा महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. अजूनही येथील हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. सरकार येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यानंतर आता सरकारने मणिपूरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह मेसेज फोटो आणि व्हिडिओंना आळा घालण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेटवर बंदी वाढविण्यात आली आहे. काही दिवसांंत […]
LPG Price Hike : दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. या काळातही महागाई (LPG Price Hike) कमी होण्याची शक्यता दिसत नाही. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला झटका (Inflation) बसला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर सुधारीत केले असून यामध्ये वाढ झाली आहे. आजपासून गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत […]
Rajasthan Congress : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने उदयपूरमधून राष्ट्रीय प्रवक्त्याला तिकीट दिले आहे. याशिवाय काँग्रेसने सिवानामधून मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत पक्षाने एकूण 151 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. धोलपूर जिल्ह्यातील भासेरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने संजय कुमार जाटव यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान […]
Jammu Kashmir Police : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार हे शहीद झाले आहेत. वेलू क्रालपोरा गावात दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून गोळीबार केला. डार हे पोलिसांत हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तांगमार्ग येथे नेण्यात आले होते. […]
Sachin Pilot Divorced: दोन राजकीय मातब्बर घराण्यातील आणि जाती-धर्माच्या भिंती तोडणाऱ्या एका लव्हस्टोरीचा तब्बल वीस वर्षानंतर द एन्ड झाला आहे. राजस्थानचे काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांची मुलगी सारा (Sara Pilot) घटस्फोट झाला आहे. या दोघांचा घटस्फोट झाल्याचे पहिल्यांदाच पायलट यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघडकीस आले […]
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न पुन्हा तापला आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटक (Karnataka) राज्योत्सवादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील चार नेत्यांना बेळगाव जिल्हा बंदी लागू केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, शंभुराज देसाई […]