नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले आहेत. त्यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर किशिदा यांनी हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. मोदींनी पीएम किशिदा यांना चंदनाची बुद्ध मूर्ती भेट दिली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी […]
राजधानी दिल्ली मध्ये पुन्हा एकदा आम आदमी पार्टी सरकार आणि केंद्र सरकार समोरासमोर आले आहेत. दिल्ली सरकारच्या 2023-24 या वर्षाच्या अर्थसंकल्प उद्या म्हणजे मंगळवारी विधानसभेत सादर होणार होते. पण केंद्राने या अर्थसंकल्पाला स्थगिती दिली आहे. मिडिया रिपोर्टनुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने आप सरकारकडून स्पष्टीकरण मागवले आहे आणि अर्थसंकल्पाच्या प्रस्तावात जाहिरातींसाठी अधिक पैसे का देण्यात आले आहेत? […]
नवी दिल्ली : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील (Shraddha Murder Case)आरोपी आफताब पूनावाला (Aftab Poonawala)याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याबाबत दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टात (Delhi Saket Court)पोलिसांनी (Delhi Police)सांगितलं की, या प्रकरणातील घटनाक्रम पाहता आफताबच्या गुन्ह्याबद्दल असा निष्कर्ष निघतो की, आरोपीने विचार करून ही घटना घडवली आहे. पोलिसांनी सांगितलं की, परिस्थितीजन्य पुराव्यावरून असं […]
केरळ : केरळ राज्याची पहिली ‘ट्रान्सजेंडर’ वकील म्हणून पद्मलक्ष्मी या बनल्या आहेत. लहानपणापासून पद्मलक्ष्मी यांनी वकील बनण्याचे स्वप्न पाहिले होते. आज त्यांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. राज्याचे कायदामंत्री पी. राजीव यांनी या संदर्भात सोशल मीडियावर माहिती देत पद्मलक्ष्मी यांचे अभिनंदन केले. पद्मलक्ष्मी यांनी भौतिकशास्त्र (Physics) या विषयात पदवी शिक्षण घेतल्यानंतर एल. एल. बी (LLB) साठी […]
नवी दिल्ली : गृहमंत्रालयानं (Home Ministry)हर्ष मंदारच्या एनजीओविरोधात (NGO)सीबीआय (CBI)चौकशीची शिफारस केली आहे. फॉरेन एक्स्चेंज रेग्युलेशन अॅक्ट म्हणजेच FCRA चे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. निवृत्त आयएएस अधिकारी हर्ष मंदार (Harsh Mandar)हे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi)यांच्या जवळचे असल्याचं म्हटलं जात आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग […]
ब्रिटनमध्ये भारतीय दुतावासावर हल्ला केल्यानंतर आता अमेरिकेत खलिस्तानींने हैदोस घातला आहे. पंजाबमध्ये अमृतपाल सिंग यांच्याविरोधात कठोर कारवाई केल्याच्या निषेधार्थ खलिस्तान समर्थकांनी हा हल्ला केला आहे. अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी पंजाब पोलीस छापेमारी करीत असून त्यांच्या अनेक समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहेत. त्यापैकी ५ जणांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाण्यात पाप करणाऱ्यांना शिक्षा […]