- Letsupp »
- national
देश
-
भारतात येणार आणखी चित्ते; PM मोदींच्या बड्डेला घोषणा होण्याची शक्यता
नवी दिल्ली : यावर्षाच्या अखेरीसपर्यंत भारतात दक्षिण आफ्रिकेतून पुन्हा एकदा चित्ते आयात केले जाणार आहेत. उद्या (17 सप्टेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला या निर्णयाची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी आयात केलेल्या आणि नवीन जन्म झालेल्या तब्बल 9 चित्त्यांच्या मृत्यूनंतरही आणखी चित्ते आयात केले जाणार असल्याने विरोधकांकडून या निर्णयावर टीका होण्याची शक्यता आहे. (Indian government […]
-
बायडन अन् सुनक यांना पिछाडले; जागतिक नेत्यांमध्ये PM मोदी पुन्हा अव्वल
नवी दिल्ली : जागतिक नेत्यांमध्ये लोकप्रियतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी पुन्हा एकदा त्यांचे अव्वल स्थान कायम ठेवले आहे. मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदींच्या नावाला 76 टक्के रेटिंग देण्यात आले आहे. या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सातव्या तर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Russhi sunak) हे 15 व्या स्थानावर आहेत. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष […]
-
‘ईडी’ला मिळाले नवीन बॉस : PM मोदींच्या मर्जीतील संचालक अखेर सेवानिवृत्त
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील समजले जाणारे संजय कुमार मिश्रा अखेर अंमलबजावणी संचालनालयाच्या संचालकपदावरुन निवृत्त झाले. त्यांच्या जागी आता ईडीचे विशेष संचालक राहुल नवीन यांची प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नियमित संचालकाच्या नावाची घोषणा होईपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाचे प्रभारी संचालक म्हणून ते काम पाहणार आहेत. सरकारने काल […]
-
भाविकांवर काळाचा घाला! भीषण अपघातात पाच ठार, 11 जखमी
Road Accident : तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन माघारी परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाची मालवाहू ट्रकला जोरदार धडक (Road Accident) बसली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले. या पाच जणात चालकाचाही समावेश आहे. पाचजण बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची या गावचे रहिवासी आहेत. शुक्रवारी सकाळी आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यातील तिरुपतीजवळील कव्वीपल्ली येथे ही दु्र्दैवी घटना घडली. […]
-
सावधान! निपाह व्हायरस कोरोना संसर्गापेक्षाही घातक, ICMR चा धोक्याचा इशारा
Nipah virus Updates : कोरोना विषाणू अद्याप जगातून पूर्णपणे गेलेला नसताना, निपाह व्हायरसने (Nipah virus) जगभरात खळबळ उडवून दिली आहे. केरळमध्ये या विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे. केरळमधील अनेक लोक या आजाराचे बळी ठरले आहेत. निपाह व्हायरस हा कोरोना पेक्षा जास्त धोकादायक आहे. कारण, यावर अद्याप कोणताही इलाज नाही. निपाह व्हायरसच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ […]
-
तेलंगणातून गोव्यात आली, लूक अन् धर्म बदलला, लग्न केलं… पण आधार कार्डमुळे बेपत्ता महिला पुन्हा सापडली
पणजी : तेलंगणाच्या महिला सुरक्षा शाखा आणि मानवी तस्करीविरोधी पथकाने पाच वर्षांपासून बेपत्ता झालेल्या एका महिलेचा अत्यंत हुशारीने शोध लावला आहे. ही महिला पाच वर्षांपूर्वी तेलंगणाच्या हुमायूननगरमधून बेपत्ता झाली होती. बेपत्ता झाल्यानंतर तिने गोवा गाठलं, स्वतःची ओळख बदलली, लूक बदलला आणि धर्म बदलून राहू लागली. काही दिवसातच दुसरे लग्न करुन नवीन संसारही थाटला. मात्र नुकतेच […]









