मोठी बातमी! एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचेही चोख प्रत्युत्तर; तणाव वाढला

मोठी बातमी! एलओसीवर पाकिस्तानकडून गोळीबार, भारताचेही चोख प्रत्युत्तर; तणाव वाढला

Pahalgam Terrorist Attack Updates : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारत देशात (Pahalgam Terror Attack) संताप धुमसत आहे. भारत सरकारनेही या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास (India Pakistan Tension) सुरुवात केली आहे. सर्वात आधी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची कोंडी करणारे निर्णय घेतले आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. याच दरम्यान अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडू लागल्या आहेत. यातच आता मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरात एलओसीवर पाकिस्तानने गोळीबार केला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानेही गोळीबार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पाकिस्तान घाबरलं! भारताविरूद्ध 8 मोठे निर्णय…युद्धाची धमकी

विशेष म्हणजे, रात्रभर हा गोळीबार सुरू होता. नियंत्रण रेषेवर असलेल्या पाकिस्तानी चौक्यांकडून हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानकडून अशा कुरापती याआधीही अनेकदा काढण्यात आल्या आहेत. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर या भागात तणाव वाढला आहे. भारतीय सैन्य अलर्ट मोडवर आहे. या घटनेनंतर लष्करप्रमुख तातडीने एलओसीकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.

बांदीपोरात एन्काऊंटर सुरू

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात जोरदार चकमक सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की सुरक्षा दलांना या परिसरात अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. यानंतर कुलनार बाजीपूरा भागात सैन्याने नाकाबंदी केली आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. सैन्याची चाहूल लागताच लपून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केला. भारतीय जवानांनाही प्रत्युत्तरात गोळीबार सुरू केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube