PM मोदी महाकुंभात पोहोचले, गंगा पूजेनंतर संगम स्नान करणार

Modi Mahakumbh

PM Modi Mahakumbh Prayagraj Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) प्रयागराजला पोहोचले आहेत. आज ते महाकुंभातील पवित्र संगमात स्नान करणार आहेत, त्यानंतर गंगेची पूजा करणार (Mahakumbh) आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार असल्याचं समोर येतंय.

मोठी बातमी! रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ; दोन बंधुंच्या घरी ईडीने टाकला छापा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच बुधवारी प्रयागराज महाकुंभात स्नान करणार आहेत. निवडणुकीच्या काळात पंतप्रधान मोदींचे संगम स्नान आध्यात्मिक आणि राजकीय दोन्ही दृष्टीने विशेष मानले जात (PM Modi News) आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पीएम मोदी आज माघ अष्टमीला त्रिवेणीत पवित्र स्नान करणार आहेत, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आणि अयोध्येतील मिल्कीपूर जागेसाठी पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होत आहे. याचा अर्थ असा की, आज अयोध्येपासून दिल्लीपर्यंत राजकीय हालचाली तीव्र आहेत.

जर आपण आकडेवारी पाहिली तर 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 वेळा निवडणुकीच्या दिवशी मंदिर किंवा तीर्थयात्रेला गेलेत. या काळात लोकसभा निवडणुका दोनदा झाल्या तर 6 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. भाजपने सलग दोन्ही लोकसभा निवडणुका जिंकल्या आणि 6 पैकी 4 राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्यात यश मिळवले.

नंदुरबारध्ये रस्ता नसल्याने महिलेची घरीच प्रसुती, बाळ दगावलं; बांबूच्या झोळीतून 15 किमीचा प्रवास

13 जानेवारीपासून सुरू झालेल्या महाकुंभात आतापर्यंत 14 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केलंय. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मोठी नावे आहेत. याशिवाय, अनेक देशांच्या प्रतिनिधींनीही महाकुंभात स्नान केलंय.

1 फेब्रुवारी रोजी 77 देशांतील 118 सदस्यांच्या शिष्टमंडळाने महाकुंभात पवित्र स्नान केले. यामध्ये अनेक देशांचे राजदूत आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश होता. महाकुंभात सहभागी झालेल्या 77 देशांमध्ये रशिया, मलेशिया, बोलिव्हिया, झिम्बाब्वे, लाटविया, उरुग्वे, नेदरलँड्स, मंगोलिया, इटली, जपान, जर्मनी, जमैका, अमेरिका, स्वित्झर्लंड, स्वीडन, पोलंड, कॅमेरून, युक्रेन, स्लोव्हेनिया आणि अर्जेंटिना यासारख्या देशांचे राजदूत समाविष्ट आहेत. उत्तर प्रदेश सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, राजदूतांनी भेटीसाठी केलेल्या व्यवस्थेबद्दल आनंद व्यक्त केला.

 

follow us