गोध्रा हत्याकांड झाले तेव्हा मी फक्त 3 दिवसांचा आमदार, एक इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरने…; मोदींनी सांगितला जुना किस्सा
PM Modi On Godhra massacre : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी निखील कामथसोबत (Nikhil Kamath) पहिलं पॉडकास्ट (PM Modi First Podcast) केलंय. यावेळी बोलताना त्यांनी गोध्रा हत्यांकाडावरही भाष्य केलं. मी व्हीआयपी नाही, मी साधा माणूस आहे, असं सांगत गोध्रा हत्यांकाड घडलं तेव्हा एक इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरने गोध्राला कसं गेलो, याचा किस्सा मोदींनी सांगितला.
VIDEO : शिर्डीत साईभक्ताकडून 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण
या पॉडकास्टमध्ये मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा एक किस्साही सांगितला. मोदी पॉडकास्टमध्ये म्हणाले की, २०१४ मध्ये जेव्हा मी पंतप्रधान झालो तेव्हा अनेक जागतिक नेते मला फोन करून शुभेच्छा देत होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचाही फोन आला. त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि भारत भेटीची इच्छा व्यक्त केली. मी म्हणालो, भारतात तुमचे स्वागत आहे. तुम्ही नक्की या. तर ते म्हणाले की, मला गुजरातला तुमच्या गावी जायचं? या भेटीचं त्यांना प्रयोजन विचारल्यावर त्यांनीसांगितलं की, तुमचं आणि आणि माझे एक खास नाते आहे. चिनी तत्वज्ञ ह्वेन त्सांग बहुतेक वेळ तुमच्या गावातच राहिला. पण जेव्हा तो चीनला परत आला तेव्हा तो माझ्या गावातच राहिला. हा आपल्याला जोडणार दुवा आहे, असं जिनपिंग यांनी सांगितल्याचं मोदी म्हणाले.
VIDEO : शिर्डीत साईभक्ताकडून 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण
गोध्रा घटनेबद्दल पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
गोध्रा हत्याकांडाबाबत बोलतांना मोदी म्हणाले की, २४ फेब्रुवारी २००२ रोजी मी पहिल्यांदा आमदार झालो आणि २७ फेब्रुवारी रोजी मी गुजरात विधानसभेत गेलो. गोध्रामध्ये अत्याचाराची घटना घडली तेव्हा मी तीन दिवसांचा आमदार होतो. प्रथम आम्हाला ट्रेनला आग लागल्याची बातमी मिळाली, नंतर हळूहळू जीवितहानी झाल्याच्या बातम्या कानावर आल्या. मी तेव्हा सभागृहात होतो आणि या घटनेमुळे मी चिंतेत होतो. मला गोध्राला जायच असल्याचं मी अधिकाऱ्यांना सांगितलं. आधी बडोद्याला जाऊन तिथं हेलिकॉप्टर घेऊन गोध्राला जाऊ असं ठरलं.
मोदी पुढं म्हणाले, पण तिथे फक्त एकच हेलिकॉप्टर होते. मला वाटतं ते ओएनजीसीचं होतं आणि त्याला एकच इंजिन होतं. ते हेलिकॉप्टर कोणत्याही व्हीआयपींना दिलं जात नव्हतं. मलाही त्यांनी हेलिकॉप्टर द्यायला नकार दिला. आमचा वाद झाला. मी सांगितलं, मी व्हीआयपी नाही, साधा नागरिक आहे, जे काही होईल त्याला मी जबाबदार असेन. नंतर मी त्याच हेलिकॉप्टरने गोध्राला पोहोचलो आणि मी ते वेदनादायक दृश्य पाहून पाहून अस्वस्थ झालो. पण मला माहित होतं की मी अशा पदावर आहे, जिथे मला माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवावे लागेल. मला जबाबदारीचं भाव ठेवावं लागेल, असं मोदी म्हणाले.
चुका होतात आणि माझ्याकडूनही काही चुका होऊ शकतात. मी देखील एक माणूस आहे, देव नाही, असं सांगत माझी जोखीम घेण्याची क्षमता अद्याप पूर्णपणे वापरली गेलेली नाही, अशी खंत मोदींनी व्यक्त केली.
अहमदाबादी लोकांची बातच न्यारी – मोदी
दिवसरात्र शिव्या ऐकून कसं वाटतं, यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की मी अहमदाबादी आहे. आमचे अहमदाबादी लोकांची एक वेगळीच ओळख आहे. एक अहमदाबादी स्कूटर घेवून जात होता, एकाला धडकला. समोरचा संतापला, तो शिव्या देवून लागला. अहमदाबादी स्कूटर घेवून थांबला. तेव्हा रस्त्याने जाणारा एक माणूस बोलला अरे तो तुला शिव्या देत आहे, अहमदाबादी व्यक्ती बोलला शिव्या देत आहे, काही घेवून तर जात नाहीये. अहमदाबादी लोकांची बातच न्यारी असं देखील मोदी म्हणाले आहेत.
यावेळी त्यांना स्वत:चं लहानपण आणि बालपणाचे मित्र यांच्या आठवणींना उजाळी दिला. माझे आता कोणतेही मित्र नाहीत, त्याशिवाय, असंही कुणी नाही जे मला तू म्हणून हाक मारतील, माझे एक शिक्षक होते, जे मला पत्र लिहायचे, ते मला नेहमी तू म्हणून बोलायचे. परंतु, ते आता या जगात नाही, असंही मोदी म्हणाले.