VIDEO : शिर्डीत साईभक्ताकडून 60 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकुट साईचरणी अर्पण
Sai devotee denoted 60 grams gold crown to Sai Baba : देशभरात साईभक्तांची संख्या मोठी आहे. साईबाबांच्या (Sai Baba) चरणी आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी नवी मुंबई येथील राघव मनोहर नरसालय या साईभक्ताने साईचरणी 60 ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट (gold crown to Sai Baba) अर्पण केला. या मुकुटाची किंमत 4 लाख 29 हजार रुपये आहे.
नव्या वाहतूक धोरणाची भारतीयांमध्ये चर्चा; असे झाले तर, थेट ‘आयटी’तल्या नोकरीला ठोकणार रामराम
हा नक्षीकाम असलेला सुंदर सुवर्ण मुकुट साईबाबांच्या चरणी अर्पण करून, साईबाबा संस्थानचे (Sai Sansthan) प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी साईबाबा संस्थानच्या वतीने श्रीमती प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी राघव नरसालय यांचा शाल आणि श्री साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, प्रशांत सूर्यवंशी उपस्थित होते.
राघव मनोहर नरसालय या साईभक्ताने श्री साईचरणी ६० ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला. या मुकुटाची किंमत ४ लाख २९ हजार रुपये आहे.#shirdi #sai #saibaba pic.twitter.com/Jy0i2jWrxL
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) January 10, 2025
नवीन वर्षाची सुरुवात अनेक लोक देवदर्शनाने (Shirdi News) करतात. राज्यभरातील हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी शिर्डीच्या साई मंदिरात देखील गर्दी केली होती. नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीनिमित्त लाखो भाविकांनी साई दर्शन घेतलं. यावेळी मंदिरात भरभरुन साईदानही दानही जमा झालंय.
मविआत एकत्र येण्यासारखं काही नव्हतं, कॉंग्रेस-शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र होते; मुनगंटीवारांची टीका
साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडून नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच तब्बल 16 कोटी 61 लाख 80 हजार रुपयांचे दान करण्यात आले आहे. हे दान 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत साईचरणी जमा झालं होतं. वर्षभरशिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश- विदेशामधून हजारो भाविक येत असतात. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर साईनगरीत लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. रोख रक्कम, सोने-चांदी या वेगवेगळ्या स्वरूपात हे दान जमा झालंय.