”केंद्रात सत्ता बदल, राज्यात अजित पवारांना भोपळा अन् शिंदेंना अल्प आनंद”

  • Written By: Published:
”केंद्रात सत्ता बदल, राज्यात अजित पवारांना भोपळा अन् शिंदेंना अल्प आनंद”

मुंबई : एकीकडे देशासह राज्यातील विविध हायव्होल्टेज जागांसाठी चार टप्प्यांमध्ये मतदार पूर्ण झाले असून, राज्यात शेवटच्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडणार आहे. मात्र, देशासह राज्यात पार पडलेल्या टप्प्यांनंतर निवडणुकांचा निकाल नेमका काय लागले याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Pruthviraj Chavan) यांनी मोठं भाकित वर्तवलं आहे. त्यांच्या या दाव्यामुळे अनेकांनी धाकधूक वाढली आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळणे अवघड असल्याने केंद्रात सत्ताबदल होईल असे चव्हाणांनी म्हटले आहे. ते सोमवारी (दि.13) ‘लोकसत्ता’ दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. (Pruthviraj Chavan On Loksabha Election Result)

शिरूर, मावळमध्ये झाली घट, पुण्यात मतदानाचा टक्का वाढला

संपूर्ण देशात भाजप विरोधी चित्र

केंद्रातील सत्ता बदलावर दावा केल्यानंतर चव्हाणांनी आतापर्यंतच्या पार पडलेल्या मतदानाचा आढावा घेतला असता, या सर्वात राज्यासह संपूर्ण देशात भाजपविरोधी वातावरण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे 2014 आणि 2019 मध्ये एकहाती सत्ता घेणाऱ्या भाजपला 2024 लोकसभेचा पेपर सुपर टफ असल्याचे ते म्हणाले.

अजित पवारांना भोपळा तर, शिंदेंना अल्प आनंद

पुढे बोलताना चव्हाणांनी महाराष्ट्रातही भाजपविरोधी वातावरण असून, लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात अजित पवारांना (Ajit Pawar) भोपळा तर, एकनाथ शिंदेंच्या गटाच्या तीन ते चार जागांवर विजय मिळतील असा अंदाज चव्हाणांनी केला आहे. तर, काँग्रेसला 12 जागांवर यश मिळू शकते. ठाकरे आणि पवारांना लोकांची सहानुभूती असल्याने मविआला राज्यात 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो, असा विश्वासही चव्हाणांनी वर्तविला आहे. इंडिया आघाडीला देशभरात साधारण 240 ते 260 जागा मिळतील असेही चव्हाणांनी म्हटले आहे.

Ahmednagar Lok Sabha Election : यंदा अहमदनगर – शिर्डीमध्ये कमी मतदान, फटका कोणाला?

चव्हाण आणि पवारांचा आकडा सेम टू सेम 

पृथ्वीराज चव्हाणांनी वर्तवलेल्या अंदाजानंतर महायुतीत धाकधूक वाढली असून, चव्हाणांच्या अंदाजापूर्वी शरद पवारांनीदेखील गुरूवारी (दि.9) साताऱ्यात सेम  टू सेम अदंदाज वर्तवला होता. राज्यात मविआला 30 ते 35 जागा मिळतील असा अंदाज पवारांनी व्यक्त केला होता. त्यामुळे चव्हाण आणि पवारांच्या या अंदाजामुळे राज्यात 45 प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज