Rooh Afza Story : आता शरबत जिहाद; मनाला तृप्त करणाऱ्या रुह अफजाची इंटरेस्टिंग स्टोरी

  • Written By: Published:
Rooh Afza Story : आता शरबत जिहाद; मनाला तृप्त करणाऱ्या रुह अफजाची इंटरेस्टिंग स्टोरी

Rooh Afza Story : Rooh Afza Story : उन्हाळा येताच शरीराला थंडावा मिळविण्यासाठी आपण ताक, वेगवेगळे सरबत पित असतो. दर उन्हाळ्यात एका सरबतचे नाव तोंडावर येते. ते नाव म्हणजे रुह अफजा (Rooh Afza).तुम्ही म्हणाल यात काय वेगळे. पण, या उन्हाळ्यात रूह अफजावरून वाद उफाळून आणालय. हा वाद कुणी राजकीय व्यक्ती नाहीतर योगगुरू रामदेवबाबांनी उफाळून आणलाय. त्यांनी पंतजलीच्या उत्पादनाचे मार्केटिंग करताना रुह अफजावर काही आरोप केलेत. रामदेवबाबा यांनी (Ramdevbaba) केलेले आरोप काय आहे. रुह अफजा शरबत बाजारात कधी आले. भारत आणि पाकिस्तानचा फाळणीशी काय संबंध आहे हे हे जाणून घेऊया.

योगगुरू रामदेव यांनी रूह अफजावर ‘सरबत जिहाद’चा आरोप केलाय. त्यांनी रूह अफजाच्या उत्पादक कंपनीवर धार्मिक निधीचा आरोप केलाय. एक विशिष्ट कंपनी शरबत विकते, परंतु त्यातून मिळणारे पैसे मदरसे आणि मशिदी बांधण्यासाठी वापरले जातात, असा आरोप रामदेवबाबांचा आहे. रामदेवबाबांनी कोणत्याही कंपनीचे नाव घेतले नाही. परंतु त्यांचा रोख हमदर्द कंपनीच्या रुह अफजा सरबतावर होता. त्याला या आरोपानंतर रूह अफजाबद्दल सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येऊ लागल्यात. तशी तर रुह अफजाची गोष्ट खूप रंजक आहे. ती 118 वर्षे जुनी आहे. हे शरबत 1907 मध्ये सुरू झाले. हकीम अब्दुल मजीद हे यूनानी चिकित्सा पद्धतीने लोकांवर उपचार करत होते. त्यांनी जुन्या दिल्लीतील त्यांच्या दवाखान्यात एक खास प्रकाराचे पेय तयार केले. त्याचे नाव रूह अफजा ठेवले. विशेष म्हणजे औषध म्हणून बनवलेल्या रूह अफजा सिरपचा उद्देश लोकांना उष्माघातापासून वाचवणे हा होता. ‘रूह अफजा’ चा मराठीत अर्थ ‘आत्म्याचे पुनरुज्जीवन’ असे होते. म्हणजेच शरीर आणि मनाला तृप्त करणारे पेय.

त्या काळात दिल्लीतील लोकांना हे सरबत खूप आवडले. उष्णता घालविण्यासाठी लोक ते खरेदी करण्यासाठी घरातून भांडी घेऊन जाऊ लागले. वाढती लोकप्रियता पाहून, रूह अफजाची मागणी वाढली.देशाच्या कानाकोपऱ्यात रूह अफजा उपलब्ध करून देण्यासाठी, हकीम अब्दुल मजीद यांनी त्याचे ब्रँडिंग सुरू केले. विशेष म्हणजे त्या काळात रूह अफजाचा लोगो मुंबईच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये बनविण्यात आला होता. तर बाटलीचे डिझाइन जर्मनीमध्ये बनविली गेली. 1940 मध्ये जुन्या दिल्लीत रूह अफजा तयार करण्यासाठी एक कारखाना उभारण्यात आला. अशा प्रकारे रूह अफजा देशभरातील घराघरात पोहोचला. रुह अफजा बनवणारी हमदर्द कंपनी सध्या 25 हून अधिक देशांमध्ये व्यवसाय करते. ही कंपनी सहाशे अधिक उत्पादने बनवते.

देशाची फाळणी अन् कंपनीचीही फाळणी

देशाची फाळणी झाली तशी हकमी अब्दुल मजीद यांच्या कुटुंबाची फाळणी झाली. मजीद यांची दोन्ही अब्दुल हमीद आणि मोहम्मद सईद या सरबत व्यवसायात होते. पण, 1947 मध्ये फाळणीनंतर त्यांचा मोठा मुलगा अब्दुल हमीद भारतातच राहिला, तर लहान मुलगा मोहम्मद सईद पाकिस्तानला गेला. त्याने कराचीमध्ये रूह अफजा विकायला सुरुवात केली. या सरबतला पाकिस्तानातही प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर सईदने पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजेच बांगलादेशमध्ये कंपनीची शाखा उघडली. बांगलादेशच्या निर्मितीनंतर मोहम्मद सईदने रुह अफझाचा बांगलादेश व्यवसाय त्याच्या मित्राकडे सोपवला.


हमदर्द कंपनीचे अनेक उत्पादने

हमदर्द कंपनीचे अनेक उत्पादने आहेत. सिंकारा, रोगन, बाबाद, शिरीन, साफी, जोशीना, स्वालीन हेही उत्पादने आहे. ही कंपनी खाद्यपदार्थाबरोबर औषधी उत्पादने निर्माण करते. 2022-23 मध्ये भारतामधील हमदर्द कंपनीने 565 कोटींची कमाई केली होती. त्यातील 500 कोटी रुपये फक्त रूह अफजा एक उत्पादनापासून मिळाले होते. या कंपनीने एक हजार कोटीचे टार्गेट ठेवले आहे. तर दुसरीकडे रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीने येत्या काही वर्षात मोठी झेप घेतलीय. 2023-24 या वर्षात पंतजली कंपनीचे खप 23 टक्के वाढला आहे. या कंपनीचे एकूण उत्पन्न तब्बल 9 हजार 335 कोटी इतके झाले आहे. एकप्रकारे रामदेव बाबांची कंपनीचे मल्टिनॅशनल कंपनी इतके उत्पन्न आहे. त्या तुलनेत सव्वाशे वर्षांपासून असलेले हमदर्द कंपनीचे उत्पन्न पतंजलीपेक्षा पाच ते सहा टक्केच आहे. तसं पाहिले तर हमदर्द कंपनी पतंजलीची स्पर्धेकही नाही. तरी रामदेवबाबांनी वाद निर्माण केला. नेमकी वादाचे पुढे काय होते ते कळेच. पण देशातील लोकांना रुह अफजाचा इतिहास माहित झाला हे नक्की.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube