Mizoram Land Slide : मिझोराममधील दगडाच्या खाणीत लँडस्लाइड, 10 मजुरांचा मृत्यू

Mizoram Land Slide : मिझोराममधील दगडाच्या खाणीत लँडस्लाइड, 10 मजुरांचा मृत्यू

Mizoram Land Slide : मिझोरामची राजधानी एजवॉलमधून एक धक्कादायक बातमी समोर (Mizoram Land Slide) आली आहे. राजधानीच्या शहराजवळील एक दगडाची खाण कोसळली. त्यामुळे दगडांच्या ढिगाऱ्याखाली दबून दहा जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण मात्र बचावले. या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या ढिगाऱ्याखाली बरेच मजूर दबले गेले आहेत त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

पंतप्रधानांचे सुरक्षा प्रमुख ते राजकीय नेता अन् थेट मुख्यमंत्री! मिझोरामच राजकारण बदलणारा IPS

मुसळधार पाऊस आणि लँडस्लाइडमुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील मेल्थम आणि हिलमेन भागात आज सकाळी ही घटना घडली. सोमवारपासून येथे मुसळधार पाऊस होत आहे. या पावसातच दगडाच्या खाणीत भूस्खलन होऊन खाण कोसळली. राज्यातील नद्यांच्या पाणीपातळीतही सातत्याने वाढ होत आहे. ढिगाऱ्यांमुळे येथील घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.

ढिगाऱ्याखालून आतापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील सहा जण राज्याबाहेरील आहेत. दोन वर्षांआधी सुद्धा मिझोराममध्ये अशीच घटना घडली होती. हनथियाल जिल्ह्यात नोव्हेंबर 2022 मध्ये एक दगडाची खाण कोसळली. या खाणीतील दगडांखाली दबल्याने 12 मजुरांचा मृत्यू झाला होता. एजवॉल शहरात सध्या मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी महामार्ग आणि रस्ते वाहतूक प्रभावित झाली आहे. हुंथर राष्ट्रीय राजमार्ग ६ वर भूस्खलनामुळे राजधानीचा संपर्क तुटला आहे.

रेमल चक्री वादळामुळे राज्यात जोरदार पाऊस होत आहे. रविवारी पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारी भागात या वादळाने धडक दिली होती. यानंतर पश्चिम बंगाल, आसाम, मिझोरामसहीत अन्य राज्यांत या वादळाचा परिणाम जाणवला. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे मोठी झाडे उन्मळून पडली.  तसेच रस्त्यांचेही मोठे नुकसान झाले.

आसाममध्ये राहुल गांधी अडचणीत! मुख्यमंत्री हिमंता यांनी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube