Bihar : वोटर लिस्टमधून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती सादर करा; SC चा निवडणूक आयोगाला आदेश

Provide information about 65 lakh voters : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी (Bihar Assembly Elections) मतदार यादीच्या (Voter list) फेरतपासणीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. विरोधी पक्षांनी यावर आक्षेप घेतल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निवडणूक आयोगाला (Election Commission) महत्त्वाचा आदेश दिलाय. न्यायालयाने बिहारमध्ये मतदार यादीतून वगळलेल्या 65 लाख मतदारांची माहिती निवडणूक आयोगाकडे मागितली आहे.
…तेव्हापासून फडणवीस मनातून उतरले, त्यांच्यामुळे मोदी सरकारचाही बट्ट्याबोळ; जरांगे आक्रमक
विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने २४ जूनपासून देशभरातील मतदार यादीची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाला एसडीआरने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याचदरम्यान, बिहारमध्ये राबविण्यात आलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेनंतर निवडणूक आयोगाने प्रकाशित केलेल्या मतदार याद्यांमधून ६५ लाख मतदारांची नावे वगळली आहेत. त्यामुळं बिहारमधील मतदारांची संख्या ७.९ कोटींवरून ७.२४ कोटींवर आली आहे.
या संदर्भात, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती उज्ज्वल भुइयां आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने आता निवडणूक आयोगाकडून मतदार यादीतून वगळलेल्या ६५ लाख मतदारांची माहिती मागितली आहे. या प्रक्रियेसाठी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला ९ ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. यासोबतच, या यादीची प्रत असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) ला देण्यास सांगितले आहे.
पाँडिचेरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार
किती मतदार घटले?
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारमधील पाटणा जिल्ह्यातील ३ लाख ९५ हजार, मधुबनी जिल्ह्यातील ३ लाख ५२ हजार, पूर्व चंपारण जिल्ह्यातील ३ लाख १६ हजार आणि गोपाळगंज जिल्ह्यातील ३ लाख १० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
फेरतपासणी पूर्वी बिहारमध्ये ७ कोटी ९० हजार मतदार होते. मात्र, निवडणूक आयोगाने सांगितले होते की, २२ लाख ३४ हजार मतदारांचा मृत्यू झाला आहे, ३६ लाख २८ हजार मतदारांनी राज्याबाहेर कायमचे स्थलांतर केले किंवा दिलेल्या पत्त्यावर सापडले नाहीत. तसेच ७ लाख १ हजार मतदारांची दुबार नोंदणी एझाली होती.
दरम्यान, २४ जून रोजी बिहारमध्ये एसआयआर प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.