Video : जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात नवं वळण; घरातील नोटांचा व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून जारी..

Video : जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात नवं वळण; घरातील नोटांचा व्हिडिओ सुप्रीम कोर्टाकडून जारी..

Supreme Court setup committee for inquiry of Delhi High Court Justice Yashwant Varma : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरात (Yashwant Varma) मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळं हे न्यायाधीश साहेब चर्चेत आलेत. हे प्रकरणावर मात्र आता देशाच्या सरन्यायाधीशांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या न्यायाधीशांच्या चौकशीसाठी तीन सदस्य समिती नेमण्यात आली आहे. यानंतर या प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या आदेशावरून जस्टिस वर्मा यांच्या घराच्या आतील फोटो आणि व्हिडिओ जारी करण्यात आले आहेत. या व्हिडिओत जस्टिस वर्मा यांच्या घरात जळालेल्या नोटांचे बंडल दिसत आहेत. दरम्यान, या प्रकरणात माझ्यावर जे आरोप होत आहेत ते आरोप विश्वसनीय नाहीत आणि हास्यास्पद आहेत असे जस्टिस यशवंत वर्मा यांनी म्हटले आहे.

यासह एक रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की ज्या खोलीत आग लागली होती त्या खोलीतील आग आटोक्यात आल्यानंतर तिथून चार ते पाच अर्धवट जळालेल्या गोण्या मिळाल्या आहेत. या गोण्यात भारतीय चलन असल्याचे अवशेष मिळाले आहेत. या प्रकरणातील कागदपत्रे देखील वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहेत.

सुप्रीम कोर्टाच्या वेबसाइटवरील प्रेसनोट मध्ये म्हटले आहे की सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांनी दिल्ली हायकोर्टाचे जस्टिस यशवंत वर्मा यांच्या विरुद्ध आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे. यामध्ये पंजाब हरियाणा हायकोर्टाचे चीफ जस्टिस शील नागू, हिमाचल प्रदेश हायकोर्टाचे चीफ जस्टिस जीएस संधावालिया आणि कर्नाटक हायकोर्टाचे जस्टिस अनु शिवरामन यांचा समावेश आहे. यशवंत वर्मा यांनी कोणतेही न्यायिक कार्य करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

न्यायमूर्ती यशवंत वर्मा कोण? ज्यांच्या बंगल्यात सापडला नोटांचा ढीग, अशी होती त्यांची कारकीर्द…

आरोप माझी बदनामी करण्यासाठीच : जस्टिस वर्मा

या प्रकरणात जस्टिस यशवंत वर्मा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. घरातून नोटा सापडल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. वर्मा म्हणाले मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने स्टोअर रुममध्ये कधीच रोख रक्कम ठेवलेली नाही. घरातून पैसे सापडल्याचे आरोप मला फसवण्याकरता आणि बदनामी करण्याकरता केले जात आहेत असा दावा यशवंत वर्मा यांनी केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube