रजनिकांत अन् कमल हासनची ती चूक थलपतीने टाळली म्हणूनच विजयाचा गुलाल उधळला!

Tamil Nadu Actor Vijay तामिळनाडूमध्ये सत्तेतील डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. कारण येथे अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी मारली आहे.

Untitled Design (2)

Tamil Nadu Assembly Election Result Film miracle Actor Vijay’s TVK wins Shock to DMK : देशाच्या राजकीय भविष्यासाठी निर्णायक ठरणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी प्रादेशिक अस्मिता, विकासाचे मुद्दे आणि सत्तांतराची शक्यता यांवर लढल्या गेलेल्या या निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यामध्ये तामिळनाडूमध्ये सत्तेतील डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. कारण येथे अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी मारली आहे.

Live Election Results 2026 : 5 राज्यांसह बारामती, राहुरीत उत्सुकता शिगेला! कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणामध्ये मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे. थालापती या नावाने देशभर प्रसिद्ध असलेला सुपरस्टार विजय यांचा पक्ष पहिल्यांदा निवडणूक लढवत आहे. तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके असं त्याच्या पक्षांचं नाव आहे. त्याने डेब्यूमध्येच धुव्वाधार कामगिरी केली आहे. तामिळनाडूमध्ये त्रिशंकू लढाई होती. मात्र यामध्ये टीव्हीके हा नवखा पक्ष तीन नंबरवर होता. मात्र आता त्याने आघाडी घेत थेट एक नंबरवर झेप घेतली आहे. त्यामुळे तामिळनाडू असो की, दक्षिण भारत या राज्यांमध्ये अभिनेत्यांची जादू चालते. त्यात आता हे पुन्हा सिद्ध झालं आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतमोजणीपूर्वीच वातावरण तापले, टीएमसी आणि बीजेपी समर्थकांमध्ये जोरदार राडा

विजयच्या या विजया मागच्या रणनितीबद्दल सांगायचं झालं तर त्याची रणनिती ही चित्रपटातील त्यांचा फॉलोअर्स वर्ग आपल्या मतदारांमध्ये बदलने. जसं या अगोदर एमजी रामचंद्रन आणि जयललिता यांनी केलं होतं. मात्र विजयने कमल हासन यांनी केलेली चूक विजयने केली नाही.

एमजी रामचंद्रन ज्यांना एनजीआर देखील म्हटले जाते. तसेच जयललिता यांच्या यशस्वी राजकीय प्रवासापासून ते कमल हासन खुशबू आणि विजयकांत यांच्या जेमतेम प्रयत्नांपर्यंत तामिळनाडूने अनेक वेळा सुपरस्टारचा राजकीय प्रवास पाहिला आहे. यामध्ये एमजीआर आणि जय ललिता हे मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर आता विजयच्या नशिबात देखील मुख्यमंत्रीपद दिसत आहे. त्याच्या विजयाची आणखी एक खासियत म्हणजे पहिल्याच प्रयत्नात भरपूर यश मिळवत तो मुख्यमंत्री होईल.

एक अभिनेता असताना एवढा मोठा विजय मिळवणाऱ्या विजयची तुलना सध्या सुपरस्टार रजनीकांत आणि ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांच्याशी होत आहे. मात्र विजयच्या तुलनेत रजनीकांत आणि कमल हासन यांची जादू राजकारणात कमी चालली. या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे विजयने राजकारणात येण्यासाठी विजयने अभिनयाला पूर्णतः पूर्णविराम दिला. त्याने स्पष्ट म्हटलं की, राजकारण हे काही पार्ट टाइम करण्याचं काम नाही, तामिळनाडूच्या मतदारांना आपण पूर्णतः समर्पित व्हायला हवं. इथेच रजनीकांत आणि कमल हासन कमी पडले. असे म्हणावे लागेल.

कारण त्यांच्या अगोदर देखील यांची एमजीआर आणि जय ललिता यांनी राजकारणात आल्यानंतर त्यांचे पूर्ण लक्ष राजकारणावर केंद्रित केलं होतं. अभिनय पूर्णतः सोडून दिला होता. मात्र रजनीकांत आणि कमल हासन राजकारण आणि अभिनय दोन्हीमध्येही सक्रिय राहिले त्यामुळे ते निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीने उतरू शकले नाही आणि त्यांचा करिष्मा दाखवू शकले नाही. त्यामुळे राजकारणात पार्ट टाइम काम करून चालत नाही. हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

follow us